Diabetes And Travel: प्रवास करणे अनेकांना आवडते पण मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी प्रवास करणे नवी आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. प्रवासात करताना तुमचा मधुमेह नियंत्रित करण्यासाठी काळजीपूर्वक नियोजन करणे आवश्यक आहे, तेही तुमच्या आरोग्याशी तडजोड न करता. येथे आम्ही काही सोप्या टिप्स
मधुमेहामुळे तुमच्या शरीरातील ग्लुकोजच्या पातळीवर प्रक्रियेवर परिणाम होतो ते आणि ते नियंत्रणात ठेवणे तुमच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. तुम्ही प्रवास करत असताना, आहारातील बदल, टाइम झोन, शारीरिक हालचाली आणि ताणतणाव या सर्वांचा तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे सतर्क राहणे महत्त्वाचे ठरते.
मधुमेही व्यक्तींनी प्रवास करताना रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी कशी घ्यावी काळजी
१. दिनचर्या पाळा : जेव्हा शक्य असेल तेव्हा तुम्ही नियमित जेवण आणि औषधांचे वेळापत्रक पाळण्याचा प्रयत्न करा त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत होईल.
२. स्नॅक्सबरोबर ठेवा : विविध प्रकारचे आरोग्यदायी स्नॅक्स जसे की खारट नसलेले काजू, धान्याचे कुरकरीत(भाजून केलेले) पदार्थ आणि कमी साखर असलेले ग्रॅनोला बार. तुम्ही प्रवासामध्ये असताना किंवा मर्यादित अन्न पर्याय असलेल्या ठिकाणावर असताना हे स्नॅक्स तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरू शकते.
३. काय खाता आणि किती खाता याकडे लक्ष द्या :काय खाता आणि किती खाता याचीकाळजी घ्या, विशेषतः बाहेर जेवताना. कार्बोहायड्रेटचे सेवन नियंत्रित करण्यासाठी जेवण इतरांसोबत वाटून खा किंवा तुमच्या गरजेनुसार जेवन ऑर्डर करण्याचा विचार करा.
४. फूड लेबल्स वाचा: तुम्ही प्रवासात पॅक केलेले पदार्थ किंवा स्नॅक्स खरेदी करत असल्यास, कार्बोहायड्रेट घटक आणि साखर तपासण्यासाठी त्यावरील पोषकतत्वांची माहिती देणारे लेबल नीट वाचा.
५. आहाराची निवड काळजीपूर्व करा: तळलेले किंवा जास्त प्रक्रिया केलेल्या पदार्थ खाण्याऐवजी ग्रील्ड, भाजलेले केलेले किंवा वाफवलेले पदार्थ निवडा. ताज्या भाज्या आणि लीन प्रोटीन प्रथिने उत्कृष्ट पर्याय आहेत.
६. पाण्याची पातळी नियत्रिंत ठेवा: पुन्हा वापरता येणारी पाण्याची बाटली सोबत ठेवा आणि नियमितपणे पाणी प्या. साखरयुक्त पेये आणि जास्त प्रमाणात कॅफिन टाळा, ज्यामुळे निर्जलीकरण होऊ शकते.
७. मद्य सेवन सयमाने करा : जर तुम्ही मद्यपान करणार असाल तर ते संयमाने करा आणि ड्राय वाईन किंवा लाइट बिअर सारख्या कमी-साखर पर्यायांचा विचार करा. अल्कोहोलचे सेवन करताना हायपोग्लाइसेमियाच्या(hypoglycemia) संभाव्यतेबद्दल जागरूक रहा.
८. सक्रिय राहा : तुमच्या प्रवासाच्या प्लॅनमध्ये शारीरिक हालचालींचा समावेश करा. रक्तातील साखरेचे नियंत्रित करण्यासाठी पायी चालत जा, जवळच्या ठिकाणी पायीच भेट द्या किंवा हॉटेलच्या खोलीतच काही साधे व्यायाम करा.
९. तणाव व्यवस्थापन: प्रवास तणावपूर्ण असू शकतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी प्रभावित होऊ शकते. आरामशीर राहण्यासाठी दीर्घ श्वास, ध्यान किंवा योगासारख्या तणाव-कमी करणाऱ्या तंत्रांचा सराव करा.
हेही वाचा – फ्लॉवर खाणे आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर; वाचा आरोग्यतज्ज्ञांनी सांगितलेले फायदे …
१०. चांगली विश्रांती घ्या: तुम्हाला पुरेशी विश्रांती मिळेल याची खात्री करा. झोपेच्या अभावामुळे रक्तातील साखरेचे नियंत्रण बिघडू शकते. शक्य तितक्या आपल्या नियमित झोपेचे वेळापत्रक चिकटवा.
११. नियमितपणे चाचणी करा: तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियमितपणे तपासा, विशेषत: प्रवासामुळे तुमची दिनचर्या लक्षणीयरीत्या विस्कळीत होत असल्यास. हे तुम्हाला तुमची औषधे किंवा इन्सुलिनचे डोस आवश्यकतेनुसार नियोजिक करण्यात मदत करेल.
तुमच्या प्रवासाच्या प्लॅनमध्ये या जीवनशैली-आधारित टिप्सचा समावेश करून, तुम्ही तुमचा मधुमेह प्रभावीपणे निंयत्रित करू शकता. रक्तातील साखरेची पातळी स्थिर राखल्यास प्रवासाचा आनंद घेऊ शकता. औषधोपचारांसाठी आरोग्य सेवा व्यावसायिकांचा सल्ला लक्षात घेणे नेहमी लक्षात ठेवा.