मधुमेह हा आजार कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो. या आजारावर कोणतेही ठोस उपचार उपलब्ध नसल्याने आपली जीवनशैली आणि आहार यांच्यामध्ये योग्य बदल करूनच आपण या आजारावर नियंत्रण मिळवू शकतो. यासाठी संतुलित आहार घेणे, नियमित व्यायाम करणे आणि वेळेवर औषधांचे सेवन करणे महत्त्वाचे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेकांना असे वाटते की केवळ साखर खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्राण वाढू शकते. मात्र असे अनेक पदार्थ आहे, ज्यामुळे आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. असेही म्हटले जाते की मद्यपान केल्यानेही मधुमेहाचा धोका वाढू शकतो. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढू लागते. साधारणत: मद्याच्या सेवनाने सामान्य माणसाच्या आरोग्यालाही हानी पोहोचते. त्यामुळे मधुमेहाचे रुग्ण मद्याचे सेवन करू शकतात का? असा प्रश्न पडतो. आज आपण याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Brown Sugar Vs White Sugar: आरोग्यासाठी कोणती साखर अधिक चांगली? तज्ज्ञांनी दिलं ‘हे’ उत्तर

मद्यपानामुळे वाढू शकते रक्तातील साखरेचे प्रमाण

जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. मद्यामध्ये साखर असते. व्होडका आणि क्रॅनबेरीमध्ये साडे सात चमचे साखर असते, तर सामान्य मद्यामध्ये जवळपास चार चमचे साखर असते. म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांनी मर्यादित प्रमाणात मद्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

मधुमेहाच्या रुग्ण किती प्रमाणात मद्याचे सेवन करू शकतात?

आरोग्य तज्ज्ञ मधुमेहाच्या रुग्णांना मर्यादित प्रमाणात मद्यपान करण्याचा सल्ला देतात. या रुग्णांनी एका आठवड्यात १४ युनिटपेक्षा जास्त मद्याचे सेवन करू नये. याहून अधिक मद्यपान केल्यास रुग्णांच्या आरोग्याला नुकसान पोहचू शकते. याउलट तुम्ही संपूर्ण आठवडा अजिबात मद्यपान केले नाही तर तुम्हाला याचा निश्चित फायदा होऊ शकतो.

तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल आणि त्याचबरोबर तुम्ही मद्यपानही करत असाल, तर तुमचे वजन कमी होण्याऐवजी वाढू लागेल. मद्यपान केल्याने आपली भूक वाढू शकते. परिणामी तुम्ही जास्त खाण्यास सुरुवात कराल आणि यामुळे तुमचे वजन वाढेल.

Heart Attack Survival Tips : हृदयविकाराचा झटका आल्यावर काय करावं? तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ टिप्स वाचवू शकतात प्राण

मधुमेहाच्या रुग्णांनी कधीही रिकाम्या पोटी मद्यपान करू नये. यावेळी काहीतरी खावे. इन्सुलिन घेणाऱ्या मधुमेहाच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मद्यपान करू नये.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diabetes diet how much should diabetic patients drink alcohol find out what the experts say pvp