how to control blood sugar leval: खराब जीवनशैली, वाढता ताण आणि व्यायामाचा अभाव यामुळे आजकाल अनेक लोकांमध्ये विविध आजारांचा धोका वाढला आहे. यापैकी एक म्हणजे मधुमेह. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यामुळे मधुमेह होतो. अशा परिस्थितीत वारंवार लघवी होणे, जास्त भूक लागणे, घाम येणे, अस्वस्थता यांसारखी अनेक लक्षणे दिसू शकतात. इतकेच नाही तर मधुमेहामुळे गंभीर हृदयविकारही होऊ शकतो.

त्यामुळे मधुमेहाला सुरुवातीच्या टप्प्यावरच थांबवल्यास आपले शरीर अनेक आजारांपासून वाचू शकते. पण तुम्ही नक्कीच विचार केला असेल की मधुमेह टाळण्यासाठी नक्की काय करावे? काही पदार्थांचे सेवन न केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.

Sugar factory workers warn of strike Government announces committee for wage hike Mumbai news
साखर कारखाना कामगारांचा संपाचा इशारा; वेतनवाढीसाठी सरकारकडून समितीची घोषणा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Keep Your Hands And Feet Warm In Marathi
Keep Your Hands And Feet Warm : हिवाळ्यात हात-पाय खूप थंड पडतात? शरीर उबदार ठेवण्यासाठी ‘हे’ सोपे उपाय करून पाहा
diabetes patient can eat diabetic friendly jackfruit ladoo know how to make Green Moong ladoo recipe in marathi
रक्तातील साखर न वाढवता घ्या ‘गोडा’चा आस्वाद! डायबिटीज रुग्णांसाठी खास हिरव्या मुगाचे लाडू
Shocking video Bat Spotted Eating Chikoo In Pune Market; Video Raises Health Concerns
पुणेकरांनो तुम्हीही बाजारातून फळं घेताय का? थांबा! ‘हा’ प्रकार पाहून पायाखालची जमीन सरकेल; VIDEO एकदा पाहाच
Himanshi Khurana's Weight Loss Secret
दररोज पराठा खाणाऱ्या हिमांशी खुरानाने केले ११ किलो वजन कमी? जाणून घ्या, तज्ज्ञ याविषयी काय सांगतात?
Benefits of eating tup chapati
पोळीला तूप, साखर लावून खाल्ल्याने होतात अनेक फायदे; पण खाण्याची योग्य वेळ कोणती?
Moong dal health benefits
दररोज भिजवलेले मूग खाणं आरोग्यासाठी घातक? मग तज्ज्ञ काय सांगतात…

फॅट टू स्लिमच्या संचालक, पोषणतज्ञ आणि आहारतज्ञ शिखा अग्रवाल शर्मा यांचे मत आहे की मधुमेहाच्या रुग्णांनी कमी ग्लायसेमिक इंडेक्स पातळी असलेले पदार्थ खावेत. रोज खाल्लेल्या काही गोष्टी रक्तातील साखर झपाट्याने वाढवण्यास मदत करतात आणि तुम्ही त्यांचे सेवन टाळले पाहिजे.

( हे ही वाचा: तुमच्या वयानुसार तुमची Blood Sugar किती हवी? जाणून घ्या ‘हा’ सोपा तक्ता)

कॉफी (coffee and diabetes)

अनेकांना रोज सकाळी कॉफी किंवा चहा पिण्याची आवड असते. कॉफीच्या सेवनाने मधुमेही रुग्णांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. जरी कॅफीनचे परिणाम प्रत्येक व्यक्तीप्रमाणे बदलत असले तरी, मधुमेह असलेल्या लोकांनी कॅफीनचे सेवन मर्यादित केले पाहिजे. शक्य असल्यास, ते काळ्या चहा किंवा ग्रीन टी चे सेवन करू शकतात.

उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असलेली फळे (Glycemic index and diabetes)

डॉ.शिखा यांच्या मते, केळी, द्राक्षे, चेरी आणि आंबा यांसारख्या काही फळांमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि साखर भरपूर प्रमाणात असते, अशावेळी त्यांच्या सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. त्यामागील कारण म्हणजे त्यांच्यामध्ये असलेली नैसर्गिक साखर. ही सर्व फळे उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या फळांच्या श्रेणीत आहेत. वास्तविक, उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ रक्तातील साखर झपाट्याने वाढवतात.

( हे ही वाचा: कोणतीही औषधे न घेता वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल होईल झपाट्याने कमी? डॉक्टरांनी दिलेला ‘हा’ सल्ला एकदा वाचाच)

लाल मांस ( Red Meat and diabetes)

डॉ. अग्रवाल यांच्या मते, लाल मांस आणि प्रक्रिया केलेले मांस मधुमेहाच्या रूग्णांसाठी हानिकारक असल्याचे अनेक संशोधनांतून दिसून आले आहे. या प्रकरणात, बेकन आणि हॅम सारख्या पदार्थांमध्ये जास्त चरबी जास्त असते. ज्याच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्याच वेळी, जास्त प्रमाणात प्रथिने खाल्ल्याने इन्सुलिनची पातळी देखील वाढू शकते.

Story img Loader