Yoga for Diabetes : भारतात अनेक लोक मधुमेह हा आजार आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्याने नियमित तपासणी, चांगला आहार घेणे गरजेचे आहे पण तुम्हाला माहिती आहे का काही योगासने सुद्धा मधुमेहासाठी उपयुक्त ठरतात.
सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे या व्हिडीओमध्ये योग अभ्यासक मृणालिनी यांनी मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर असलेले तीन योगा सांगितले आहेत.
योग अभ्यासक मृणालिनी यांनी सांगितल्याप्रमाणे –
१ . मंडूकासन
२. पवनमुक्तासन
३. अर्धमत्स्येन्द्रासन
या व्हायरल व्हिडीओमध्ये योग अभ्यासक मृणालिनी यांनी क्रमवार मंडूकासन, पवनमुक्तासन आणि अर्धमत्स्येन्द्रासन करुन दाखवले आहे. प्रत्येक योगासन करताना एकाच स्थितीत ३० सेकंदापर्यंत राहायचं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

yogamarathi या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मधुमेहामुळे जर तुम्ही त्रस्त असाल तर योग्य डाएट,डॉक्टरांचा सल्ला आणि व्यायाम करणं गरजेचं आहे.मधुमेहाबरोबर ही 3 योगासने बऱ्याच गोष्टींवर उपयुक्त आहे जसे की
१.पोटावरील चरबी कमी होण्यास उपयुक्त आसन आहे.
२.गॅस, अपचन, बद्धकोष्ठता, भूक न लागणे असे अनेक विकार या आसनाच्या सरावाने दूर होतात.
३. हृदयाची कार्यक्षमताही सुधारते.

या व्हिडीओवर युजर्सच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप सुंदर” तर एका युजरने विचारले, “वज्रासन करता येत नाही, कसे करावे?