मधुमेह या रोगामुळे मेंदू आकुंचन पावतो व मेंदू दर दहा वर्षांत प्रत्येकी दोन वर्षे आधीच वयस्कर होतो, असा धोक्याचा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. मधुमेहाच्या अभ्यासात असेही दिसून आले, की स्मॉल व्हेसल इश्किमिक डिसीज या रोगातही मधुमेहाचा संबंध नसतो. मेंदूला ऑक्सिजनयुक्त रक्त मिळत नाही, त्यामुळे हा रोग होत असतो.
पेनसिल्वानिया विद्यापीठातील पेरेलमान स्कूल ऑफ मेडिसीनचे एन निक ब्रायन यांनी सांगितले, की ज्या लोकांना तीव्र स्वरूपाचा मधुमेह असतो, त्यांच्यात मेंदूच्या उती कमी असतात. टाइप २ हा मधुमेहाचा प्रकार नेहमी आढळतो त्यात स्वादुपिंड पुरेसे इन्शुलिन तयार करीत नाही किंवा पेशी तयार केलेल्या इन्शुलिनकडे दुर्लक्ष करतात. मधुमेह आता वाढत असून त्याच्यावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे, त्यामुळे रुग्णाचा प्रकृती सुधारू शकते.
ब्रायन व त्यांच्या सहकाऱ्यांनी मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग पद्धतीने टाइप २ मधुमेह असलेल्या ६१४ रुग्णांच्या मेंदूची तपासणी केली, हे काम १० वर्षे चालू होते. जास्त मधुमेह असेल तर मेंदूचे आकारमान कमी असते, जास्त काळ मधुमेह राहिल्यास मेंदूचा राखाडी रंगाचा भाग कमी होत जातो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला १० वर्षे मधुमेह होतो, तेव्हा त्याचा मेंदू मधुमेह नसलेल्या व्यक्तीच्या तुलनेत २ वर्षे वृद्ध होतो व त्याचे राखाडी रंगाचे घटक कमी होतात. त्याचा परिणाम पुढे जाऊन बोधन शक्तीवर वाईट प्रकारे होतो. या बोधनातील बदलांचा संबंध मेंदूच्या ऱ्हासाशी असतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा