सध्या मधुमेह हा सामान्य आजार बनत चालला आहे. प्रत्येक घरातील एक ना एक रुग्ण मधुमेहाने ग्रस्त असतो. मधुमेह हा असा आजार आहे जो पूर्णपणे बरा होऊ शकत नाही पण नियंत्रित केला जाऊ शकतो. मधुमेहाच्या आहारात सामान्यतः अशा गोष्टींचा समावेश होतो ज्यामध्ये साखरेचे प्रमाण कमी असते आणि ज्यामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. फळांबद्दल बोलायला गेलं तर सर्वसाधारणपणे बहुतेक फळे गोड असतात. अशा परिस्थितीत शरीरासाठी आरोग्यदायी साखर असलेली फळे कोणती आणि अस्वास्थ्यकर साखर असलेली कोणती फळे आहेत हे पाहिले जाते. आज आम्ही तुम्हाला अशा काही फळांची यादी सांगणार आहोत ज्यात साखरेची पातळी जास्त असते आणि ते खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकते. म्हणूनच सामान्यतः त्यांना न खाण्याचा सल्ला दिला जातो. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मधुमेह रुग्णांनी ‘ही’ फळे चुकूनही खाऊ नये

अननस 

अननसाचा एक तुकडा जरी खाल्ला की त्यात साखर जास्त असल्याचे जाणवते. यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना हे फळ न खाण्याचा सल्ला दिला जातो. एक कप अननसात १६ ग्रॅम साखर असते. म्हणून, मधुमेहाच्या रुग्णांनी अननस हे फळ खाऊ नये.

( हे ही वाचा: वयाच्या चाळीशीत शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण किती असले पाहिजे? ‘या’ ५ गोष्टींचे सेवन झपाट्याने कमी करेल ‘Bad Cholesterol’)

चेरी 

चवीला अप्रतिम असणार्‍या चेरी खाण्यात खूप मजा येते, पण रक्तातील साखरेची पातळी वाढवण्यात चेरी कारणीभूत ठरते. चेरी खाल्ल्यानंतर मधुमेहाच्या रुग्णांची रक्तातील साखरेची पातळी झपाटयाने वाढू शकते, त्यामुळे हे फळ खाण्यास टाळणे आवश्यक आहे. 

लिची 

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, परंतु एक कप लिचीमध्ये २९ ग्रॅम पर्यंत साखर असते. जी तुमची साखरेची पातळी झपाटयाने वाढवू शकते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी याचे सेवन करणे पूर्णपणे टाळावे.

( हे ही वाचा: हिवाळ्यात ‘या’ ३ आजारांचा होतो सर्वाधिक त्रास; आतापासूनच सावध व्हा, नाहीतर उद्भवेल गंभीर समस्या)

अंजीर 

लिचीप्रमाणे, एक कप अंजीरमध्ये २९ ग्रॅम पर्यंत साखर असते. खरं तर पौष्टिकतेने भरलेले फळ केवळ साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे मधुमेही रुग्णांसाठी याची शिफारस केली जात नाही. 

आंबा

मधुमेहाच्या रुग्णांना साधारणपणे आंबा न खाण्याचा किंवा मर्यादित प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो. एक कप आंब्यामध्ये २३ ग्रॅम पर्यंत साखर असते. ही बाब लक्षात घेऊन उच्च रक्तातील साखर असलेल्या रुग्णांनी आंबे खाण्याच्या इच्छेवर थोडे नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diabetes patients should avoid eating these fruits as they are known to increase blood sugar level gps