Natural treatment for blood sugar: मधुमेह हा सामान्य आजार बनत चालला आहे. आजकाल तरुण आणि वृद्धांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे. मधुमेहामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. त्यामुळे इन्सुलिनच्या उत्पादनावर परिणाम होतो. दैनंदिन जीवनशैलीत छोटे-मोठे बदल करून मधुमेहावर नियंत्रण मिळवता येते. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी कडू गोळ्या आणि औषधे घेण्याऐवजी हे घरगुती उपाय करून पहा…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मालविका करकरे, आहारतज्ज्ञ, सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पुणे यांच्या मते, मधुमेह हा एक मेटाबॉलिक क्रॉनिक डिसऑर्डर आहे. मधुमेही रुग्णांना मधुमेहामध्ये आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते, परंतु मधुमेही रुग्णांनी सर्व काही खाणे बंद करावे, असे नाही. मधुमेहामध्ये इन्सुलिन आणि आहार यांचा जवळचा संबंध आहे.

अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नवी दिल्ली येथील वैद्यकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. पीयूष जैन यांनी मधुमेहावरील महत्त्वाची माहिती शेअर करताना सांगितले की, साखर वाढणे ही केवळ समस्या नाही तर ती सतत वाढत राहिल्याने त्याचा शरीराच्या इतर भागांवर देखील परिणाम होऊ शकतो.

( हे ही वाचा: आता मधुमेहापासून होणार कायमची सुटका? बाबा रामदेव यांनी सांगितलेला असरदार उपाय जाणून घ्या)

टाइप १ मधुमेहाच्या रुग्णांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात

डॉ. जैन यांच्या म्हणण्यानुसार, टाइप १ मधुमेहामध्ये इन्सुलिनचे उत्पादन पूर्णपणे थांबते, अशा स्थितीत लोकांना असे वाटते की एकदा इन्सुलिन घेतल्यास त्यांना आयुष्यभर इन्सुलिन घ्यावे लागेल. काही लोक हे टाळण्यासाठी गोळ्या घेतात, त्यांना वाटते की मधुमेह बरा होईल. लक्षात ठेवा की इन्सुलिन घेण्यास घाबरू नका.

टाइप २ मधुमेहाच्या रुग्णांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात

टाईप २ मधुमेहामध्ये, रक्तातील साखर प्रथम औषधांनी नियंत्रित केली जाते, परंतु काहीवेळा रक्तातील साखरेची पातळी इतकी वाढते की औषधांनी ती नियंत्रित करणे कठीण होते. अशा परिस्थितीत, इन्सुलिन इंजेक्शन वापरले जाते. इन्सुलिन हा हार्मोनचा एक प्रकार आहे, त्यामुळे ते खराब होणार नाही अशा तापमानात ठेवा.

( हे ही वाचा: रक्तातील साखर न वाढवता घ्या ‘गोडा’चा आस्वाद! डायबिटीज रुग्णांसाठी खास ‘लाडू’ची रेसिपी पाहा)

मधुमेहामध्ये रोज ‘या’ गोष्टींचे सेवन करा

संशोधनानुसार, मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या आहारात सफरचंद, संत्री, पेरू, किवी, पीच यांचा समावेश करावा. याशिवाय संशोधनानुसार, मधुमेहासाठी ड्राय फ्रूट्स रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. शेंगदाणे आणि बदाम खाल्ल्याने साखरेची पातळी कमी करता येते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी अक्रोड खाणे खूप फायदेशीर आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diabetes prevention tips blood sugar can be controlled by consuming this one thing gps