जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या जवळपास ७७ मिलियन लोक टाइप 2 मधुमेहाने ग्रस्त आहेत तर सुमारे २५ मिलियन लोक प्री-डायबेटिसने ग्रस्त आहेत याचा अर्थ त्यांना भविष्यात मधुमेह होण्याची शक्यता आहे. दुर्दैवाने मधुमेहावर कायमस्वरूपी इलाज नाही आणि म्हणूनच तो आटोक्यात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. मधुमेह हा शरीराच्या अनेक अवयवांना इजा पोहोचवू शकतो तसंच तो मृत्यूला कारणीभूतही ठरू शकतो.
मधुमेहाच्या समस्येपासून आपला बचाव करण्यासाठी चांगल्या आहाराचा समावेश करायला हवा. ज्यामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या पदार्थांचे सेवन करायला हवा. मधुमेहाच्या रुग्णांसाठी रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत, जे औषधांसोबत वापरल्यास फायदेशीर ठरू शकतात. त्यापैकी एक उपाय म्हणजे आपल्या आजूबाजूला आढळणाऱ्या वनस्पती. या वनस्पतींचा वापर आपण रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी करु शकतो. तर कोणत्या ववस्पतींची पाने खाल्याने रक्तातील साखर नियंत्रित ठेवता येते याबाबतची माहिती जाणून घेऊया.
हेही वाचा- दात घासण्याआधी करा हे एक काम; केसाचे स्प्लिट एंड्स आणि त्वचेचा ड्रायनस होईल गायब
कडुलिंबाची पाने –
एनसीबीआयच्या अहवालानुसार, मधुमेहाची समस्या जाणवत असल्यास गोड कडुलिंबाची पाने खाल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. पानांमध्ये असलेले फायबर पचन प्रक्रिया मंदावते आणि चयापचय गतिमान करत नाही, ज्यामुळे तुमची रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
तुळशीची पाने –
तुळस ही आयुर्वेदातील सर्वात शक्तिशाली औषधी वनस्पती मानली जाते. या वनस्पतीला धार्मिक महत्त्व आहेच शिवाय तीच्यामध्ये अनेक गंभीर रोगांशी लढण्याची क्षमता आहे. मधुमेहावर नियंत्रण ठेवायचे असेल तर हे पान पाण्यात उकळून प्यावे. तुळशीच्या पानांचा रस रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत करतो.
हेही वाचा- शरीरात लोह कमी झाल्यास दिसतात ‘ही’ लक्षणं; पाहा वयानुसार तुम्हाला किती लोह गरजेचं आहे
इन्सुलिन वनस्पती –
मधुमेहाच्या रुग्णांसाठी इन्सुलिन प्लांट (कॉस्टस इग्नियस / इन्सुलिन प्लांट लीव्हस) एखाद्या औषधासारखं काम करते. एनसीबीआयच्या संशोधनानुसार या पानाच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी कमी होते. या वनस्पतीच्या पानांचे सेवन करणाऱ्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेची पातळी बऱ्याच प्रमाणात नियंत्रित राहते.
आंब्याची पाने –
आंब्याच्या पानांमध्ये एन्झाइम मॅंगिफेरिन असते, ज्यामध्ये अल्फा-ग्लुकोसिडेस रोखण्याची क्षमता असते, जे स्वादुपिंडातील कार्बोहायड्रेट चयापचय कमी करण्यास मदत करते आणि रक्तातील साखर वाढण्यापासून रोखते. आंब्याच्या पानांमध्ये इन्सुलिन वाढवण्याची आणि ग्लुकोज नियंत्रित करण्याची क्षमता असते. आंब्याच्या पानांमध्ये पेक्टिन, व्हिटॅमिन सी आणि फायबर भरपूर प्रमाणात असते, हे दोन्ही मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलसाठी फायदेशीर असतात.
पेरूची पाने –
NCBI मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, पेरूच्या पानांचा रस रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकतो. तसंच पेरूच्या पानांचा रस अल्फा-ग्लुकोसिडेसची क्रिया रोखू शकतो. तर पेरूची पाने गरम पाण्यात उकळवून चहा म्हणूनही पिऊ शकता.