Health Tips: अनेकदा आपण त्वचेसंबंधीत अनेक समस्यांना तुम्ही सामान्य समजता. परंतु त्या समस्या दीर्घकाळ राहिल्यास किंवा वारंवार होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष केल्यास शारीरिक हानी होऊ शकते. अशा परिस्थितीत मधुमेहाच्या रुग्णांची खूप काळजी घ्यावी लागते. कारण त्यांच्या त्वचेवर एखादी जरी जखम झाली किंवा काही एॅलर्जी झाली तर ती गंभीर रुप घेऊ शकते. यामुळे आम्ही आज तुम्हाला रक्तात साखरेचे प्रमाण जास्त झाल्यास त्वचेवर दिसणाऱ्या १२ लक्षणांबद्दल सांगणार आहोत, जी लक्षणे ओखळून तुम्हाला शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेऊ शकता.
१) त्वचेवर पिवळे, लाल किंवा तपकिरी रंगाचे दाणे येणे
अनेकदा त्वचेवर पिवळे, लाल किंवा तपकिरी रंगाचे लहान घन दाणे येतात जे मुरुमांसारखे दिसतात. हळुहळू ते फुगतात आणि त्वचेवर अधिक कडक पॅच तयार करतात. यामुळे शरीरावर जखम होऊ शकते.
२) त्वचेचा रंग गडद आणि मखमलीसारखा वाटतो
मानेची, काखेची, मांडीची किंवा इतर ठिकाणची त्वचा काळी पडू लागते आणि स्पर्श केल्यावर मखमलीसारखी वाटते. याचा अर्थ असा होऊ शकतो की, तुमच्या रक्तात इन्सुलिन जास्त आहे. हे अनेकदा प्री-डायबिटीजचे लक्षण असते. याला अकॅन्थोसिस निग्रिकन्स असेही म्हणतात.
चेहऱ्यावरील ‘या’ लक्षणांवरून ओळखू शकता तुम्ही किती पाणी पिता, कसे ते जाणून घ्या
३) त्वचा कडक होणे
जर हाता- पायांच्या बोटांची त्वचा जाड आणि कडक वाटत असेल तर हे देखील रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्याचे लक्षण आहे. याला डिजिटल स्क्लेरोसिस म्हणतात. यामध्ये हातांचा मागचा भाग कडक आणि मेणासारखा दिसतो. यामुळे बोट कडक होतात ज्यामुळे हालचाल करणे कठीण होऊ शकते. अनेकदा केवळ हाता-पायांची बोटचं नाही तर शरीराचा एक एक अवयव सुजल्याप्रमाणे दिसतो. विशेषत: पाठीच्या वरच्या बाजूला, खांद्यावर आणि मानेवरील त्वचा जाड फुगीर दिसते. यात अनेकदा चेहरा, खांदे आणि छाती क्वचित वेळा गुडघे, घोट्याच्या किंवा कोपरांवरील त्वचा देखील जाड होते, ज्यामुळे पाय सरळ करणे किंवा हात वाकणे कठीण होते.
४) फोड येणे
मधुमेह असलेल्या रुग्णांच्या त्वचेवर अनेकदा फोड दिसून येतात. या फोड जास्त किंवा कमी देखील असू असतात. हात, पाय, पाय किंवा कपाळावर या फोड तयार होतात ज्यानंतर मोठ्या होतात. हे फोड दुखत नाहीत.
५) त्वचेवर इंफेक्शन होणे
ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांना त्वचेचा संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक असतो. यात अनेकदा त्वचा गरम होऊन सुजलेली दिसते. शिवाय त्वचेवर खाज सुटते, पुरळ आणि काहीवेळा लहान फोड येतात, त्वचा कोरडी खवलेयुक्त दिसते. त्वचेचे संक्रमण शरीराच्या कोणत्याही भागावर होऊ शकते, जसे की बोटांवर, एक किंवा अधिक नखांच्या खाली किंवा टाळूवरही होऊ शकते.
६) डायबिटिक अल्सर
दीर्घकाळापर्यंत रक्तातील साखर (ग्लुकोज) जास्त राहिल्याने रक्ताभिसरण आणि मज्जातंतूंचे नुकसान होऊ शकते. यामुळे जखमा किंवा फंगल इंफेक्शन होऊ शकते. विशेषतः पायांवर ही लक्षणे जास्त दिसतात. या होणाऱ्या जखमा किंवा इंफेक्शनला डायबेटिक अल्सर म्हणतात.
७) शिन स्पॉट
शिन स्पॉट हा त्वचेचा एक प्रकार आहे ज्यामध्ये डाग (कधीकधी रेषा) तयार होतात, ज्याला डायबेटिक डर्मोपॅथी म्हणतात. हे सहसा अनुवंशिक असते. यात हात, मांड्या, धड किंवा शरीराच्या इतर भागांवर डाग किंवा रेषा दिसतात.
८) पिवळे फोड
अनेकदा शरीरावर पिंपल्ससारखे दिसणारे पिवळ्या फोड दिसतात. मुरुमांपेक्षा हे फोड लवकर पिवळे होतात. सहसा हे मांड्या, कोपर किंवा गुडघ्यांच्या मागे दिसतात. पण त्या कुठेही येऊ शकतात.
९) त्वचा लालसर होणे
मधुमेह असलेल्या लोकांमध्ये त्वचेच्या मोठ्या भागावर ग्रॅन्युलोमा अॅन्युलर होण्याची शक्यता असते, यात त्वचा लाल दिसते किंवा त्वचेवर बारीक पुरळ उठतात.
१०) त्वचा अतिशय कोरडी होत खाज येते
तुम्हाला मधुमेह असल्यास तुमची त्वचा कोरडी असण्याची शक्यता जास्त असते. हायरिस्क डायबिटीज(ग्लुकोज) यामुळे होऊ शकते. रक्ताभिसरण बिघडले किंवा इन्फेक्शन झाले तर त्वचाही कोरडी पडते, खाज सुटते.
११) पापण्यांवर किंवा त्याच्या आजूबाजूला पिवळसर खवले येतात
तुमच्या रक्तात चरबीचे प्रमाण जास्त असते तेव्हा अशाप्रकारची लक्षणे विकसित होतात. यामुळे डायबिटीज असलेल्यांना धोका वाढतो. याला जैंथिलास्मा असे म्हणतात
१२) त्वचेचे टॅग
अनेक लोकांच्या त्वचेवर काही विशिष्ट टॅग असतात. जसे की, त्वचेवर पांढरे, पिवळे किंवा राखाडी रंगाचे चामखीळ सारखे फोड दिसतात. पण या चामखीळचे प्रमाण अचानक वाढल्यास तुमच्या रक्ताच साखरेचे प्रमाण वाढत असून ज्यामुळे टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढत असल्याचे दर्शवते.
( हा लेख केवळ माहितीसाठी आहे. सविस्तर माहितीसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)