भारतात मधुमेहाचे निदान करण्यासाठी वापरण्यात येणारी पद्धती सदोष असल्याचा दावा अमेरिकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठातील संशोधक संजय बसू यांनी केला आहे.  भारतात सध्या उपलब्ध पाहणीचा अहवाल आणि ग्लुकोमीटर वापरून निदान केले जाते. त्या पद्धतीत त्रुटी असल्याचे बसू यांनी म्हटले आहे. त्यातून येणारे निष्कर्ष फसवे असू शकतात आणि त्यातून नागरिकांना विनाकारण भरुदड पडू शकतो, असे ते म्हणाले. त्याऐवजी लक्षणांवर आधारित चाचण्या वापरल्यास अधिक योग्य निदान होऊ शकते आणि भारताच्या मोठय़ा लोकसंख्येला फायदा होऊ शकतो, असे बसू यांनी सांगितले.

Story img Loader