Foods For a Diabetic : आपल्या देशात अनेक लोकांना मधुमेह आहे.मधुमेहाच्या रुग्णांना नियमित तपासणी करणे आणि चांगला आहार घेणे आवश्यक आहे. अनेकदा मधुमेहाचे रुग्ण आहाराकडे दुर्लक्ष करतात पण असे केल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. आज आपण मधुमेहाच्या रुग्णांनी काय खावे, याविषयी जाणून घेणार आहोत.
न्युट्रिशनिस्ट अंजली मुखर्जी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी खावे, असे काही आरोग्यदायी पर्याय त्यांनी सांगितले आहे.
- अंजली मुखर्जी यांनी सांगितल्याप्रमाणे-
- फायबरयुक्त भाजीपाला
- डाळी
- नट्स
- ओट्स
- कारल्याचा ज्युस
- मेथी दाणे
- ग्रीन टी
- जवस
anjalimukerjee या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन अंजली मुखर्जी यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मधुमेहाचे रुग्णांनी कमी खावे असे नाही. त्यांनी आरोग्यदायी आहार खावा. मधुमेहाच्या रुग्णांनी सांगितलेल्या पर्यायांचे सेवन करावे. ग्लायसेमिक इंडेक्स कमी असणारे अन्न आणि फळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.