कर्करोगासारख्या दुर्धर आजाराच्या निदानासाठी हिऱ्याचा वापर खूप महत्त्वपूर्ण ठरू शकतो, हे नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. हिऱ्यातून बाहेर पडणारे प्रकाशकिरण मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग (एमआरआय) तंत्रामध्ये वापरण्यात येणाऱ्या प्रकाशकिरणांप्रमाणे काम करतात. त्यामुळे शरीरात कर्करोगाची गाठ असल्यास त्याचा शोध प्राथमिक अवस्थेत लागू शकतो. कर्करोगाच्या रूग्णांना योग्य वेळेत उपचार मिळाल्यास ते या आजारातून सहीसलामत बाहेर पडू शकतात. त्यामुळे हिऱ्याच्याबाबतीतील या संशोधनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कर्करोग प्राथमिक अवस्थेत असताना हिऱ्यामध्ये असणाऱ्या रासायनिक गुणधर्मांमुळे ‘एमआरआय’ चाचणीच्यावेळी त्याचे निदान होऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर उपचारांना सुरूवात केली जाऊ शकते. एरवी केमोथेरपीच्या औषधांमध्येही सुक्ष्म आकारातील हिऱ्यांचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे रूग्णांना त्या औषधांची उलटबाधा होत नाही, अशी माहिती सिडनी विद्यापीठातील प्राध्यापक डेव्हिड रेईली यांनी दिली. विषारी घटकांना विरोध करण्याची हिऱ्याची अंगभूत क्षमता आणि चुंबकीय गुणधर्मांचा एमआरआय तंत्रात वापर करून घेतल्यास प्राथमिक अवस्थेतच कर्करोगाचे निदान करणारी नवीन उपचारपद्धती अस्तित्वात येऊ शकते, असेदेखील रेईली यांनी सांगितले.

Story img Loader