नवरात्रीच्या या नऊ दिवसांच्या उपवासादरम्यान दररोज एक मोठी समस्या राहते की उपवासात आहारासाठी कोणते अन्नपदार्थ बनवावेत. बहुतांश वेळा उपवासात साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा यासारखे पारंपरिक पदार्थ तयार केले जातात. मात्र रोज तेच पदार्थ खाऊन कंटाळा येणे स्वाभाविक आहे. जर तुम्हालाही अशाच नेहमीच्या उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्हाला उपवासाचे डोसे कसे बनवायचे ते सांगणार आहोत. यामुळे केवळ तुमच्या तोंडाची चवच बदलणार नाही, तर तुमचे पोट उर्जेने भरलेले असेल. उपवासाचे डोसे बनवण्यासाठी आपण प्रामुख्याने उपवासात खाल्ली जाणारी भगर आणि साबुदाणा वापरू शकता. तुम्हाला काही सोप्या स्टेप्स सांगणार आहोत, त्या फॉलो करून तुम्ही घरी सहज उपवासाचे डोसे बनवू आणि खाऊ शकता.

डोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

भगर- १ कप

Crispy Butterfly Samosa Recipe
‘बटरफ्लाय समोसा रेसिपी’, नाव ऐकूनच तोंडाला सुटलं ना पाणी, लगेच वाचा साहित्य आणि कृती
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
Ragi Upma Recipe
२ वाटी पीठापासून नाश्त्यामध्ये बनवा नाचणीचा पौष्टिक उपमा; वाचा साहित्य आणि कृती
Jaggery Makhana recipe
उपवासाच्या दिवशी आवर्जून बनवा गूळ मखाणा; एकदम सोपी रेसिपी
Nutritious laddoos Recipe
फक्त १० मिनिटांत बनवा पौष्टिक लाडू; पटकन वाचा साहित्य आणि कृती

साबुदाणा – ४ चमचे

उकडलेले बटाटे – २

साखर – १ टीस्पून

काळी मिरी – १/२ टीस्पून

हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या- २

आले किसलेले – १ तुकडा

शेंगदाणे – १ टेस्पून

कोथिंबीर चिरलेली – १/२ कप

जिरे – १ टीस्पून

मीठ – चवीनुसार

उपवासाचा डोसा कसा बनवायचा

उपवासाचा डोसा तयार करण्यासाठी आधी भगर आणि साबुदाणा घ्या आणि त्यात साखर मिक्स करा. त्यानंतर हे मिश्रण मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकून बारीक पावडर तयार करा. पावडर तयार झाल्यावर एका भांड्यात काढून घ्या. आता या पावडरमध्ये काळी मिरी आणि चवीनुसार मीठ घाला. आता डोसा बनवण्यासाठी मिश्रण पातळ करा. लक्षात ठेवा की पिठ इतक पातळ असावं जे आपण सामान्य डोसा बनवताना पीठ तयार केलं जातं.

आता एक कढई घ्या आणि गरम करण्यासाठी ठेवा. आता त्यात शेंगदाणे घालून त्यांना भाजून घ्या. साधारण एक मिनिट असे केल्यावर त्यात तूप घाला. यानंतर जिरे, हिरवी मिरची आणि आले घालून १ मिनिट परतावे. आता उकडलेला बटाटे घ्या आणि चांगले मॅश करून त्यात टाका. यानंतर काळी मिरी पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ घालून चांगले मिक्स करा. काही वेळ शिजवल्यानंतर गॅस बंद करा आणि सारण बाहेर काढा आणि प्लेटमध्ये ठेवा.

आता गॅस हाय फ्लेमवर ठेवा आणि तवा गरम होऊ द्या. आता त्यावर थोडेसे तेल टाका आणि टिश्यू पेपरच्या मदतीने स्वच्छ करा.आता डोसासाठी तयार केलेलं पीठ घ्या आणि कढईच्या मध्यभागी टाकून यानंतर हे पीठ सामान्य डोसा प्रमाणे मधून पसरवा. आता थोडे तेल सर्वत्र पसरवा आणि डोसा चांगला शिजू द्या. थोड्या वेळाने डोसा पलटी करा आणि दुसऱ्या बाजूनेही शिजू द्या.

आता डोसा रंग गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या. तुम्हाला पाहिजे असल्यास डोसामध्ये स्टफिंग भरू शकता किंवा आपण डोसा एका प्लेटमध्ये बाहेर काढू शकता आणि स्टफिंग वेगळे सर्व्ह करू शकता. अशा प्रकारे तुमचा उपवासाचा डोसा तयार आहे.

Story img Loader