Dark Chocolate for Skin : डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे सर्वांनाच माहीत आहेत, पण तुम्हाला माहित आहे का की ते चेहऱ्यावर लावल्यानेही अनेक फायदे होतात. डार्क चॉकलेटमध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात, जे आपली त्वचा निरोगी ठेवतात. यामुळे त्वचेचा रंगही सुधारतो आणि त्वचा चमकदार बनते. याशिवाय ते त्वचेतील आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. चला तर मग जाणून घेऊयात त्वचेवर डार्क चॉकलेट लावायची योग्य पद्धत.

चॉकलेटमुळे त्वचा कशी चमकते

Dragon fruit benefits for skin and hair
त्वचा आणि केसांसाठी ड्रॅगन फ्रूट फायदेशीर; जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
how to make neem kadha for glowing skin
त्वचेच्या समस्येसाठी कडुलिंबाचा काढा आहे फायदेशीर; जाणून घ्या बनवण्याची योग्य पद्धत
Roasted chana with kishmish benefits
उपाशीपोटी हरभरा आणि मनुक्यांचे सेवन केल्याने होतात अनेक फायदे
Radish leaves are more beneficial
वजन कमी करण्यापासून ते त्वचा चमकदार बनवण्यापर्यंत; मुळ्याची पाने आहेत अधिक फायदेशीर
Six reasons to start chewing guava leaves every day
फक्त पेरु नव्हे तर पेरुची पाने देखील आहेत गुणकारी! रोज पेरुची पाने चघळण्याची सहा कारणे
Soaking Dry Fruits
रात्रभर पाण्यात भिजवलेले ड्रायफ्रुट्स खाणं योग्य आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचे उत्तर…
Pomegranate Juice For Glowing Skin
Glowing Skin Tip : हिवाळ्यातही चमकदार दिसेल तुमची त्वचा, फक्त ‘या’ फळाचा ज्यूस दररोज प्या; जाणून घ्या इतर फायदे

कॅफीन आणि थियोब्रोमाइन नावाचे घटक डार्क चॉकलेटमध्ये आढळतात ज्यामुळे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. त्यामुळे त्वचेची लवचिकताही कायम राहते. अशा प्रकारे डार्क चॉकलेटचा समावेश त्वचेच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. चॉकलेटमध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात जे त्वचेला उन्हापासून होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात. ते त्वचेच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात आणि त्यांना निरोगी ठेवतात. हेच डार्क चॉकलेट मॉइश्चरायझेशनचे काम करते, त्यामुळे ते त्वचेवर सहज लावता येते. याशिवाय यामध्ये कॅफिन असते ज्यामुळे त्वचा घट्ट होण्यास मदत होते. त्वचाही मुलायम, गुळगुळीत बनते आणि चमकते.

तेलकट त्वचेसाठी फायदेशीर

ज्या लोकांची त्वचा तेलकट असते त्यांना मुरुम, आणि सुरकुत्या या समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत डार्क चॉकलेट, मुलतानी माती आणि लिंबू यांचा वापर खूप फायदेशीर ठरू शकतो. डार्क चॉकलेटमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्ससारखे घटक असतात जे त्वचेसाठी फायदेशीर असतात. हे त्वचेच्या पेशींचे नुकसान कमी करतात आणि मुरुमांपासून मुक्त होतात.

हेही वाचा >> हिवाळ्यात आरोग्यदायी ठरतो गुळाचा चहा; ‘असा’ करा फक्कड चहा! दूध नासणार नाही, चहा पांचटही होणार नाही..

कोरड्या त्वचेसाठी फायदेशीर

कोरड्या त्वचेसाठी डार्क चॉकलेट हा उत्तम पर्याय आहे. डार्क चॉकलेटमध्ये असलेले कॅफिन आणि थिओब्रोमाइनसारखे अँटिऑक्सिडंट त्वचेला आतून हायड्रेट करतात. एका वाटी दुधात २-३ चमचे डार्क चॉकलेट पावडर मिसळा, त्यात १ चमचा मध आणि अर्धा चमचा ऑलिव्ह ऑईल घाला. चांगले मिसळा. चेहरा धुवून स्वच्छ करा आणि हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. १०-१५ मिनिटांनंतर मऊ हातांनी मसाज करून पाण्याने धुवा.दुधात असलेले लॅक्टिक ऍसिड त्वचा स्वच्छ ठेवते. मध आणि ऑलिव्ह ऑइलमुळे त्वचेवर ओलावा टिकून राहतो. आठवड्यातून २-३ वेळा असे केल्याने कोरडी त्वचा ठीक होईल.

Story img Loader