सामान्यपणे फळांचे औषधी गुणधर्म आपल्यापैकी अनेकांना ठाऊक असता. किंवा एखाद्या झाडाच्या पानांचा औषधी उपयोगही काहीजणांना ठाऊक असतो. मात्र अनेक फुलांमध्येही औषधी गुणधर्म असतात हे खूप कमी लोकांना ठाऊक असते. म्हणूनच आज आम्ही सांगत आहोत औषधी गुणधर्म असणाऱ्या आणि अनेकदा घरातील कुंड्यांमध्येच येणाऱ्या फुलांबद्दल…

सफरचंद आणि संत्र्याची फुलं
या दोन्ही फळ झाडांची फुले परदेशात मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या माध्यमांतून खाल्ली जातात. खरं सांगायचं तर ज्या फळ झाडांच्या फुलांचे वेगवगेळ्या माध्यमातून सेवन केले जाते त्या यादीत या दोन्ही फळ झाडांचा पहिला क्रमांक लागतो. या झाडांच्या फुलांची पावडर किंवा अंश असणाऱ्या पदार्थांचे सेवन केल्यास अनेक आजारांपासून मुक्ती मिळते. उच्च रक्तदाब, रक्त शुद्धी, त्वचेचा पत सुधारण्यासाठी ही फुले गुणाकरी ठरतात. या फुलांच्या औषधी गुणधर्माबद्दल खूप कमी लोकांना माहित आहे. ऑरेंज ब्लॉसम टी, अॅपल ब्लॉसम टी या नावाने या फुलांच्या चवीची चहापावडर अनेक सुपरमार्केट्समध्ये सहज उपलब्ध असते.

painkillers, addiction, Pune, Young woman arrested,
पुणे : वेदनाशामक औषधांचा नशेसाठी वापर, तरुणी अटकेत; औषधांच्या १६० बाटल्या जप्त
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
50 percent vacancies in FDA, FDA, drug licensing,
‘एफडीए’मध्ये ५० टक्के पदे रिक्त, औषध परवाना व औषध तपासणीवर परिणाम
Distribution of fake inheritance certificates by court clerk navi Mumbai news
न्यायालयातल्या लिपिकाकडून बनावट वारस दाखल्यांचे वाटप;  पनवेल येथील न्यायालयातील प्रकार, लिपिक अटकेत
phulala sugandh maticha fame actress samruddhi kelkar birthday Celebration photos
‘फुलाला सुगंध मातीचा’ फेम समृद्धी केळकरने कुटुंबासह ‘असा’ साजरा केला वाढदिवस, फोटो शेअर करत म्हणाली…
Five Rarest Cat Breeds
मांजरीच्या दुर्मीळ पाच जाती कोणत्या तुम्हाला ठाऊक आहे का? जाणून घ्या माहिती…
Mumbai boat accident three members of Ahire family died from Pimpalgaon Baswant in Nashik
मुंबईतील बोट अपघातातील मृतांमध्ये पिंपळगावच्या तिघांचा समावेश
Six reasons to start chewing guava leaves every day
फक्त पेरु नव्हे तर पेरुची पाने देखील आहेत गुणकारी! रोज पेरुची पाने चघळण्याची सहा कारणे

जास्वंदाचे फुल
गणपतीसमोर आवर्जून वाहिले जाणाऱ्या या फुलाचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. या फुलाचा उपयोग सॅलेड सजवण्यासाठी करण्यात येतो. जास्वंद या नावापेक्षा हिबस्कस या नावाने या फुलाचे प्रोडक्ट जास्त लोकप्रिय आहेत. हिबस्कस टीचे अनेक फायदे आहेत. लाल रंगाच्या जास्वंदाच्या फुलाच्या पाकळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात. त्यामुळे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. तसेच जास्वंदाच्या फुलाचे पावडर स्वरूपात सेवन केल्याने केसगळती थांबते. तसेच ही पावडर यकृताच्या आजारांवर गुणकारी असते, बद्धकोष्ठावर उपचार म्हणून ही पावडर वापरण्याचा सल्ला अगदी आयुर्वेदातही देण्यात आला आहे. आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात हिबस्कस पावडर सहज उपलब्ध असते.

गुलाब
तुम्ही कधीतरी पाहुण्यांकडे गेल्यावर गुलाबपाणी प्यायलाच असाल. हे गुलाबपाण्याचे सीरप गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्यांपासून बनते. गुलाबच्या फुलाच्या पाकळ्या जवळपास सर्वच पदार्थांमध्ये खाण्यास योग्य आहेत. या फुलाच्या पाकळ्यांचा सॅलेड, आइसस्क्रिम, मिठाई, जॅम-जेली आणि जेवणामध्ये उपयोग केला जातो. हे फुल हृदयाचे आजार, कर्करोग आणि मधुमेहासारखे आजारांवर रामबाण औषध आहे. याशिवाय पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी, चेहऱ्यावरील पुळ्या आणि डाग नैसर्गिक उपचारांद्वारे घालवण्यासाठी गुलाब गुणकारी ठरतो.

लॅव्हेंडरचे फुल
लॅव्हेंडरचे फुलं सामान्यपणे साजवटीसाठी वापरली जातात. या सुगंधी फुलांच्या पावडरचा आणि सिरपचा उपयोग आइसस्क्रिम आणि दह्यामध्ये केला जातो. या फुलांच्या पावडरीचा वापर अँटी-ऑक्सिडन्ट म्हणून केला जातो. मधुमेहावरील नैसर्गिक उपचार, मुड स्वींग तसेच ताणावरील उपाय, जखमेवर लावण्यासाठी, त्वचा तसेच केसांच्या आरोग्यासाठी, डोकेदुखीवर आणि झोपेशी संबंधित आजारांवर या फुलाच्या पावडरीचा वापर समान्यपणे केला जातो. ही पावडर अ जीवनसत्वाचा उत्तम स्त्रोत आहे.

शेवंती
शेवंतीच्या फुलांमध्ये अँटी-ऑक्सिडेंट आणि मिनरल्स असतात. क्रिझॅन्थरम नावाने या फुलांच्या नावाची चहा पावडर सुपर मार्केटमध्ये सहज मिळते. तर आयुर्वेदिक औषधांच्या दुकानातही या फुलाच्या पाकळ्यांची पावडर उपलब्ध असते. या फुलाच्या पावडरीचा उपयोग छातीतील दुखणे, उच्च रक्तदाब, टाईप टू प्रकारचा मधुमेह, ताप, सर्दी, डोकेदुखी, शिंक येणे, सूज आल्यास त्यावर उपचार करण्याऱ्या औषधांमध्ये केला जातो. खास करुन दक्षिण चीनमध्ये या फुलाचा चहात मोठ्या प्रमाणात वापर होतो.

झेंडू
प्रत्येक सणासुदीला आवर्जून घरी आणले जाणारे फुल म्हणजे झेंडूचे. देव कार्यात वापरले जाणाऱ्या या फुलाचे औषधी गुणधर्म वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. मारीगोल्ड हर्बस म्हणजे झेंडूच्या फुलांचा वापर करुन तायर करण्यात आलेली औषधे आयुर्वेदीक औषधे घेणाऱ्यांना नक्कीच ठाऊक असतात. जखमा भरण्यासाठी, किड्या-मुंग्यांचे चावण्यावर या फुलाच्या पाकळ्याच्या पावडरचा समावेश असलेले अॅण्टीरिपेलन्ट वापरले जातात. या फुलांच्या फ्लेवरमध्ये अगदी जास्त किंमतीच्या चहापासून ते ग्रीन टी पर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहे. या चहाच्या सेवनाने प्यायल्यास पोटातील गॅसेसचा, पोटात अचानक कळ येण्याचा त्रास कमी होतो. पाय, डोळे, तोंड, त्वचेवरील जंतूवर या फुलाची पावडर वापरून बनवलेली औषधे म्हणजे रामबाण उपाय आहे.

Story img Loader