Refrigerator Myths : फ्रिज ही आपल्या घरातील अत्यंत महत्त्वाची वस्तु आहे. थंड पाणी आणि बर्फासाठी याचा उपयोग केला जातो. याशिवाय अन्नपदार्थ सुरक्षित ठेवण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे उपकरण मानले जाते. पण तुम्ही ठेवलेला प्रत्येक पदार्थ आपल्यासाठी निरोगी असतो का? फ्रिजमध्ये आपण अनेक गोष्टी ठेवतो पण कोणत्या वस्तू ठेवू नये, हे तुम्हाला माहीत आहे का?
सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये फ्रिजमध्ये कोणत्या गोष्टी ठेवू नये ? याविषयी डॉ. मानसी मेहेंदळे यांनी सविस्तर माहिती सांगितली.

या व्हिडीओमध्ये डॉ. मानसी मेहेंदळे सांगतात –

अर्धवट कापलेला कांदा

बऱ्याच लोकांना सवय असते की अर्धवट कापलेला कांदा फ्रिजमध्ये बाहेर पडतो, त्याचे विषारी गॅसमध्ये रूपांतरित होते. त्यामुळे जर तुम्ही कांदा कापला तर लगेच संपून टाका पण फ्रिजमध्ये ठेवू नका म्हणजे इतर गोष्टींना त्याचा वास येणार नाही.

मळलेली कणीक

बऱ्याच लोकांना सवय असते की मळलेली कणीक फ्रिजमध्ये ठेवतात आणि दोन तीन दिवस ती कणीक वापरायची पण अशाने तुम्ही शिळं अन्न खाऊन तुमच्या शरीरामध्ये चुकीची संप्रेरके तयार होतात. चुकीचे पाचक स्त्राव तयार होतात. कणीक भिजवून फ्रिजमध्ये कधीही ठेऊ नये.

हेही वाचा : अभिनेत्री क्रिस्टल डिसूझाने केले होते ६० तास नॉन-स्टॉप शूट! विश्रांती न घेता काम केल्याने शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…

पाहा व्हिडीओ

आलं लसूण

आल्याची पेस्ट, लसणाची पेस्ट तुम्ही फ्रिजमध्ये ठेवू शकता. अख्ख आलं की लसूण कधीही फ्रिजमध्ये ठेवू नये. कारण आलं जर तुम्ही फ्रिजमध्ये ठेवले तर त्याला बुरशी येते कारण फ्रिजमध्ये ठेवलेले पदार्थ ओले होतात, दमट होतात. त्यामुळे त्याच्यावर बुरशी येते आणि त्याचे सेवन केल्याने आपल्याला त्रास होऊ शकतो.

आलं लसूण, कांदा, मळलेली कणीक या गोष्टी अजिबात फ्रिजमध्ये ठेवू नका. आणि फ्रिजमध्ये काहीही ठेवले तरी त्याच्यावर झाकण ठेवायला विसरू नका.

हेही वाचा : Health Tips: शिजवलेल्या भाज्या की कच्च्या भाज्या? कोणत्या भाज्या खाणं जास्त फायदेशीर; वाचा संपूर्ण माहिती

healyourselfwith_manasikrishna या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “फ्रिज मधे या गोष्टी का ठेवू नये ?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “फ्रिजमध्ये नाही पण बाहेर ठेवले तर चालेल” तर एका युजरने लिहिलेय, “तुम्ही लयच भारी भारी माहिती देता ओ..” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूप छान माहिती.. धन्यवाद.”