Male Fertility: लैंगिक शरीरसंबंधाद्वारे नव्या जीवाची उत्पत्ती होत असते. शरीरसंबंध (Sex) हा मानवी जीवनातील महत्त्वपूर्ण भाग आहे. नैसर्गिकरित्या पुनरुत्पादन करण्याच्या क्षमतेला ‘प्रजनन क्षमता’ असे म्हटले जाते. पुरुषांची प्रजननक्षमता निरोगी शुक्राणूंच्या संख्येवर अवलंबून असते. शरीरसंबंधाच्या माध्यमातून पुरुषांमधील शुक्राणू स्त्रियांच्या गर्भाशयापर्यंत पोहचत असतात आणि त्यानंतर गर्भधारणेची प्रक्रिया सुरु होत असते.

पुरुषांच्या वीर्यामध्ये शुक्राणूंच्या कमतरतेमुळे गर्भधारणा होण्यामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. शुक्राणूंचे प्रमाण कमी होण्यासाठी विविध घटक कारणीभूत असू शकतात. आहारामधील चुकांमुळेही पुरुषांच्या शरीरातील शुक्राणू कमी होण्याची शक्यता असते. दैनंदिन जीवनामध्ये काही ठराविक गोष्टी फॉलो केल्याने ही समस्या टाळता येते.

Itishri Expanding Horizons and Obstructing Frames
इतिश्री: विस्तारणारं क्षितिज आणि अडवणाऱ्या चौकटी
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
milkoscan fda marathi news
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना दुधातील भेसळ रोखण्यासाठी मिळणार मिल्कोस्कॅन यंत्र
Bad sleep Routine can increase heart disease risk losing one hour of sleep takes four days to recover
झोपेचं रुटीन बिघडलंय! फक्त एक तासाची कमी झोप तुमच्या आरोग्यासाठी ठरेल धोक्याची घंटा? तज्ज्ञांनी केला खुलासा
increasing weight, health special, health,
health special : वाढत्या वजनाने मानसिकतेवर कसा परिणाम होतो?
These simple tips will help you keep your bike
पावसाळ्याच्या दिवसात बाईक स्वच्छ ठेवण्यासाठी ‘या’ सोप्या टिप्स करतील मदत
Health centers should be capable of diagnosing cancer
‘कर्करोग निदानासाठी आरोग्य केंद्रे सक्षम हवीत’
india s defense export in marathi
विश्लेषण: संरक्षण सामग्री निर्यातीत लक्षणीय वाढ? निर्यात कशी वाढतेय?

प्रजनन क्षमता वाढावी यासाठी पुरुषांनी त्यांच्या आहारामध्ये कोणते बदल करणे अपेक्षित आहे हे जाणून घेऊयात.

१. संतुलित आहार घ्यावा. आहारामध्ये पालेभाज्या, फळ, धान्य, कडधान्य, प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स असलेल्या पदार्थांचा समावेश करावा.

२. व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. या व्हिटॅमिनमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. काही संशोधनांनुसार, व्हिटॅमिन सीमुळे प्रजनन क्षमता वाढू शकते.

३.फास्ट फूड खाण्याचे प्रमाण कमी करा. या पदार्थांमध्ये अत्यावश्यक फॅट्स, साखर व अन्य कृत्रिम पदार्थ असतात. प्रोसेस्ट आणि जंक फूड खाल्याने प्रजनन क्षमतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतात.

आणखी वाचा – हस्तमैथुन केल्याने खरंच शुक्राणूंची संख्या कमी होते का? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात

४. व्हिटॅमिन ई आणि सेलेनियम यांसारख्या अँटिऑक्सिडंट्समुळे शुक्राणूंचे नुकसान होण्याचे प्रमाण कमी होते. परिणामी यांचे नियमितपणे सेवन करावे.

५. व्हिटॅमिन डी हे प्रजननसाठी महत्त्वपूर्ण असते. यामुळे शरीरातील टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढत जाते. एका निरीक्षणात्मक अभ्यासानुसार, पुरुषांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास त्यांच्या शरीरामधील टेस्टोस्टेरॉन कमी होत जाते. यामुळे व्हिटॅमिन डी असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. कोवळ्या उन्हात उभे राहिल्यानेही व्हिटॅमिन डी शरीरापर्यंत पोहोचतो.

६. टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढावी यासाठी आहारामध्ये मेथीचा समावेश करावा. त्यामधील औषधी गुणांमुळे शरीराला इतर फायदेदेखील होत असतात.

आणखी वाचा – विश्लेषण: भारतात Sperm Donor कोण होऊ शकतं? १० सर्वात महत्त्वाचे निकष जाणून घ्या

७. शरीरामध्ये झिंकची कमतरता असल्यास त्याचा परिणाम शुक्राणूंच्या संख्येवर होऊ शकतो. झिंक सप्लिमेंट्स घेतल्याने टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण नियंत्रणात राहते.

८. अश्वगंधा ही एक औषधी वनस्पती आहे. प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. अश्वगंधामुळे शरीरातील टेस्टोस्टेरॉन पातळी वाढते तसेच निरोगी शुक्राणूंची संख्या वाढत जाते.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)