पावसाळ्यात व्हायरल आजारांचा धोका वाढतो. खास करून डेंग्यू आणि मलेरिया आजारांचा धोका सर्वात जास्त असतो. ज्याचा परिणाम भारतातील कोट्यावधी लोकांवर होतो. याला आपण वेक्टर-जनित विषाणूचा रोग म्हणतो, जो एडीज एजिप्टी नावाच्या डासांद्वारे पसरतो. हे डास घरगुती वातावरणात आणि आजूबाजूला साठवून ठेवलेल्या शुद्ध पाण्यात वाढतात. तज्ज्ञांचं असं मत आहे हे की, खबरदारी घेतल्यास कोणताही रोग बरा होऊ शकतो. हे खरे आहे की पावसाळ्यात वेक्टर-जनित विषाणूजन्य आजाराचा धोका असतो, म्हणून हे टाळण्यासाठी सेलिब्रिटी आहार विशेषज्ञ ऋजुता दिवेकर यांनी काही टिप्स शेअर केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सेलिब्रिटी आहार विशेषज्ञ ऋजुता दिवेकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी लिहिलंय की, ” काही सोप्या टिप्सची यादी आहे…डेंग्यू आणि मलेरियामधून तुम्हाला लवकरात लवकर बरं होण्यासाठी मदत होईल.” या पोस्टमध्ये त्यांनी डाएट प्लॅन ते व्यायामाच्या टिप्सपर्यंत सर्व गोष्टी ऋजुता दिवेकरांनी शेअर केल्या आहेत.

एक चमचा गुलकंद सकाळी किंवा जेवणाआधी खा. यामुळे आंबटपणा, मळमळ आणि अशक्तपणा टाळण्यास मदत होते.

दुसऱ्या टिप्समध्ये त्यांनी एक पेय पिण्याचा सल्ला दिलाय. यात एक ग्लास दूध आणि एक ग्लास पाणी घ्यायचं आहे. यात एक चिमूटभर हळद, 2-3 केशर आणि थोडे जायफळ घाला. ते अर्धे कमी होईपर्यंत उकळा. नंतर ते थंड किंवा कोमट होऊ द्या आणि चवीनुसार गूळ घाला. हे पेय जळजळ कमी करण्यास मदत करेल, असं आहारतज्ज्ञ ऋतुजा यांनी सांगितलंय.

हायड्रेशनचे महत्त्व सांगताना ऋजुता यांनी म्हटलं आहे की, “लघवीचे प्रमाण राखण्यासाठी आणि रंग साफ आहे हे तपासण्यासाठी दिवसभर पाणी पिणं महत्वाचं आहे.”

व्यायामासंदर्भात बोलताना ऋजुता म्हणाली, “सुप्त बधाकोनासन करत रहा. अय्यंगार स्टाइलमध्ये पाठीला आधार देण्यासाठी बोल्ट आणि मानेला आधार देण्यासाठी डोक्याखाली एक घोंगडी वापरा. यामुळे शरीरातील थकवा कमी होतो.

यापूर्वी, ऋजुता दिवेकरने हिने आणखी एक व्हिडीओ शेअर केला होता. यात तिने गुडघे, पाय यासारख्या खालच्या शरीराला मदत करण्यासाठी काही व्यायाम करण्याचा सल्ला दिलाय. प्रत्येक ३० मिनिटांमध्ये बसल्यानंतर किमान ३ मिनिटे तरी उभं राहण्याचा सल्ला दिलाय. हा व्हिडीओ शेअर करताना तिने एक कॅप्शन देखील लिहिलीय. “खालच्या शरीरासाठी सोपे आणि प्रभावी स्ट्रेच. सुजलेल्या घोट्या, पाठीच्या आणि गुडघ्यात जडपणा आणि पायातील कमजोरी दूर करण्यास मदत करते.”, असं तिने या कॅप्शनमध्ये लिहिलंय.

ऋजुता दिवेकर अनेकदा तिच्या सोशल मीडियावर आरोग्य आणि आहार संबंधी व्हिडीओ आणि पोस्ट शेअर करत असते. अन्न कशा पद्धतीने खावेत आणि कधी खावेत, तसंच तंदुरुस्त दिसण्यावर नाही तर आतून तंदुरुस्त असण्यावर आहे, हे ती वारंवार तिच्या वेगवेगळ्या पोस्टमधून लोकांना सांगत असते.