ड्रायफ्रूट्स हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. डॉक्टर देखील प्रत्येकाला त्यांच्या आहारात ड्रायफ्रूटचा समावेश करण्याचा सल्ला देतात. जर तुम्हाला फिट राहायचे असेल, प्रतिकारशक्ती मजबूत करायची असेल, शरीरातील जीवनसत्वे, प्रोटीनचे प्रमाण वाढवायचे असेल तर ड्रायफ्रूट्स खाणे खूप गरजेचे असते. त्यामुळे आपले अनेक आजारांपासून संरक्षण होते. दिवसभर काम करण्यासाठी, शरीर सक्रिय आणि मजबूत ठेवणे खूप महत्वाचे आहे. अशा स्थितीत सकाळी शरीराला प्रोटीन, फायबर आणि एनर्जीची गरज असते. यामुळेच लोक रिकाम्या पोटी ड्रायफ्रूट्स खातात. त्यामुळे शरीरातील थकवा आणि अशक्तपणा दूर होतो. काही ड्रायफ्रूट्स हाडे मजबूत करून आपलं आरोग्य सुधारण्यास मदत करतात.
मात्र सकाळी ड्रायफ्रूट्स खाऊ नये. बऱ्याचदा लोक बदामासोबतच इतर ड्रायफ्रूट्स घेणेही पसंत करतात. ज्यामुळे त्यांच्या आरोग्याला गंभीर नुकसान होऊ शकते. म्हणूनच, जाणून घ्या रिकाम्या पोटी भिजवलेल्या बदामासोबत कोणते ड्राय फ्रूट्स खाणे धोकादायक ठरू शकते आणि का…
खजूर
खजूर खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढण्यास मदत होते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी बदाम आणि खजूर एकत्र खाणे धोकादायक मानले जाते. त्यामुळे प्रथिने आणि हेल्दी फॅट्ससोबत खजूर खाण्याचा सल्ला दिला जातो जेणेकरून साखर हळूहळू विरघळते आणि शरीराचे नुकसान होत नाही.
वाळलेले अंजीर
बद्धकोष्ठता दूर करून पोटाचे आरोग्य सुधारण्यासाठी कोरड्या अंजीरचे कोणतेही नुकसान नाही, परंतु त्यात जास्त प्रमाणात फायबर आणि साखर असल्यामुळे पोटदुखी आणि उच्च रक्तदाब सारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे हे रिकाम्या पोटी खाणे टाळावे.
मनुका
मनुका हे असे ड्रायफ्रूट आहे की ते रिकाम्या पोटी किंवा इतर ड्रायफ्रुट्ससोबत खाल्ल्याने आरोग्याला हानी पोहोचते. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, यात केवळ पोषणच नाही तर भरपूर साखरही असते. रिकाम्या पोटी याचे सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. या अचानक वाढीमुळे मधुमेही रुग्णांच्या समस्या वाढू शकतात.
वाळलेले मनुके
बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी सुके मनुके खूप फायदेशीर मानले जातात. यातील सत्व पोटासाठी चांगले मानले जातात, परंतु जर हे ड्रायफ्रूट रिकाम्या पोटी खाल्ले तर अतिसार होऊ शकतो. त्यात साखर देखील आढळते, ज्यामुळे रक्तातील साखर वाढू शकते.
हेही वाचा >> Green Tea: ग्रीन टी दिवसातून किती वेळा घ्यावी? ग्रीन टी पिताना ‘या’ चुका करु नका
जर्दाळू
जर्दाळूमध्येही साखरेचे प्रमाण जास्त असते, तसेच रिकाम्या पोटी खाल्ल्यास पचन बिघडू शकते. यामुळे पोटदुखी आणि ॲसिडिटीचा त्रासही होऊ शकतो. हे ड्राय फ्रूट नेहमी प्रथिनयुक्त पदार्थांसोबत खाण्याचा सल्ला दिला जातो.