कोणीही व्यक्ती अचानक मृत्युमुखी पडली की त्याला मोठा हार्ट अ‍ॅटॅक आला अशी कुजबूज सुरू होते. मात्र त्याचवेळेस डॉक्टरांना विचारायला गेलात तर त्या व्यक्तीला अचानक कार्डिअ‍ॅक अरेस्ट झाला असे ते सांगतात. साहजिकच हार्ट अ‍ॅटॅक आणि कार्डिअ‍ॅक अरेस्ट या दोन निदानांमध्ये सर्वसामान्यांचा खूप गोंधळ होतो आणि बऱ्याचदा त्यांची सरमिसळ होते. आजच्या जीवनात अशा प्रकारच्या घटना घरांमध्ये आणि घराबाहेर वरचेवर घडत असल्यामुळे, या दोन्ही आजारांची योग्य माहिती आणि त्याचे उपचार प्रत्येकाने जाणून घेणे आवश्यक ठरले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री नवी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात निधन झाले.  त्यांचा मृत्यू कार्डिअॅक अरेस्टने झाल्याचे सांगण्यात येत आहे. याच हार्ट अॅटॅक आणि कार्डिअॅक अरेस्टमधील फरक समजून घेऊया..

 

हार्ट अ‍ॅटॅक

कार्डिअ‍ॅक अरेस्ट

१.याचा अर्थ हृदयाला होणारा रक्त पुरवठा खंडित होणेम्हणजे हृदयाचे स्पंदन किंवा धडधड बंद होणे
२.रक्ताभिसरणातून उद्भवणारा हा गंभीर दोष आहे.हृदयातील विद्युत क्रिया (इलेक्ट्रिकल अ‍ॅक्टिव्हिटी) बंद पडल्यामुळे निर्माण होणारा हा प्राणांतिक दोष असतो.
३.हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या एखाद्या रक्तवाहिनीतील रक्तप्रवाह बंद होऊन त्या स्नायूला होणारा रक्त पुरवठा थांबतो. त्यामुळे हृदयाच्या स्नायूचा तो भाग निर्जीव होतो.हृदयाचे पंपिंग पूर्ण थांबते आणि मेंदूकडे तसेच हृदयासह शरीरातील इतर अवयवांकडे जाणारा रक्तपुरवठा बंद पडतो.
४.हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर व्यक्ती जिवंत असते.

हृदयाचे स्पंदन आणि श्वास सुरू असते.

व्यक्तीचे हृदयाचे स्पंदन पूर्ण बंद पडल्यावर व्यक्तीची शुध्द पूर्ण हरपते.

त्यानंतर श्वसन बंद पडते आणि त्या व्यक्तीचा मृत्यू होतो

 

५.

 

छातीत दुखणे, दम लागणे, डाव्या खांद्यात दुखणे, खूप घाम येणे अशी लक्षणे असतात.बहुसंख्य वेळा कोणतेही लक्षण रुग्णाला आधी कळत नाही.
६.औषधे, इंजेक्शने देऊन आणि वेळ पडल्यास अॅन्जिओप्लास्टी करून प्राण वाचवता येतात.काही मिनिटात कृत्रिम श्वासोच्छ्वास आणि सीपीआर देऊन तसेच यंत्राद्वारे डी.सी. शॉक, हृदयात अॅडरीनॅलिनचे इंजेक्शन देऊन काही प्रसंगी हृदय पुन्हा चालू होऊ शकते
७.यामागे उच्च रक्तदाब, रक्तातील कोलेस्टेरॉलची उच्च पातळी, धूम्रपान, मधुमेह, स्थूलत्व ही मुख्य कारणे असतात.हृदयाचे ठोके खूप जास्त किंवा खूप कमी पडणे किंवा अनियमित पडणे, काही हृदय विकार, हार्ट अ‍ॅटॅक, रक्तदाब खूप वाढणे किंवा खूप कमी होणे, रक्तातील पोटशियम सारख्या काही घटकांचे प्रमाण वाढणे ही या मागील कारणे असू शकतात.
हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर –
  • इसीजी काढावा
  • पाण्यात विरघळणाऱ्या अ‍ॅस्पिरीनच्या १५० मि.ग्रॅमच्या २ गोळ्या आणि
  • क्लोपिडोग्रेल-७५ या औषधाच्या ४ गोळ्या द्याव्यात

 

कार्डिअ‍ॅक अरेस्ट झाल्यावर-
  • सीपीआर, कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा
  • त्वरित कार्डिअ‍ॅक अॅम्ब्युलन्सला फोन करावा आणि
  • त्या व्यक्तीला जवळच्या इस्पितळात करोनरी आययसीयूमध्ये दाखल करावे.

-डॉ.अविनाश भोंडवे, फॅमिली फिजिशियन

                                              

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Difference between heart attack and cardiac arrest former external affairs minister sushma swaraj passes away nck
Show comments