थंडीचा हंगामाला आता सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत वाहनांशी संबंधित अनेक समस्या लोकांसमोर येत आहेत. मोटारसायकल आणि स्कूटर लवकर सुरू न होणे ही यातील सर्वात प्रमुख समस्या आहे. त्यांना सुरू करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. जेव्हा तुम्ही ऑफिसला जाण्यासाठी तयारी करत असता आणि तुमचे वाहन अजिबात सुरू होत नाही तेव्हा ही समस्या अधिकच गंभीर बनते. पण तुम्हाला याची काळजी करण्याची गरज नाही. येथे नमूद केलेली काही टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला या त्रासांपासून वाचवू शकते.
इंजिन नियमितपणे सुरू करा
हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी लोकं आपली दुचाकी वाहने, मोटारसायकल, स्कूटर चालवत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हिवाळ्यात दुचाकी वाहने बराच काळ वापरली जात नाहीत. त्यामुळे इंजिन नियमित चालत नसल्यामुळे ही समस्या उद्भवते. म्हणूनच, तुम्ही ते वापरत असलात किंवा नाही, दररोज काही काळासाठी तुमचे वाहन सुरू करणे महत्त्वाचे आहे.
वेळेवर इंजिन ऑइल बदला
इंजिन ऑइल नियमित वेळेनुसार बदलले पाहिजे. जेव्हा जाड इंजिनचे ऑइल पातळ होते, तेव्हा ते नीट काम करत नाही ज्यामुळे इंजिन निकामी होऊ शकते. मोटरसायकल किंवा स्कूटरचे सर्व्हिसिंग आणि इंजिन ऑइल बदलणे आवश्यक असेल तेव्हा बदले पाहिजे.
इंजिनला किक-स्टार्ट करणे
थंड हवामानात तुमचे दुचाकी वाहन नेहमी किक-स्टार्टने सुरू करण्याचा प्रयत्न करा. मात्र काही लोकं जास्त सेल्स किंवा बटणे लावून वाहन सुरू करतात, त्यामुळे समस्या अधिकच बिकट होते.
स्पार्क प्लग स्वच्छ ठेवा
स्पार्क प्लग ही कोणत्याही ऑटोमोबाईलमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. स्पार्क प्लग स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे, कारण ते इंजिन सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. स्पार्क प्लग स्वच्छ नसल्यास, त्यामुळे इंजिन सुरू करण्यात समस्या निर्माण होऊ शकतात.
बॅटरी चार्ज ठेवा
चार्ज करण्यासाठी बॅटरी महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे, बॅटरी पूर्णपणे चार्ज झाली आहे की नाही किंवा तिची वायर चांगल्या स्थितीत आहे का ते नेहमी तपासा. जर वायर खराब स्थितीत असेल किंवा बॅटरी डिस्चार्ज झाली असेल, तर मेकॅनिकद्वारे ती तपासणे आणि चार्ज करणे चांगले.