मेथीच्या दाण्यांमध्ये फायबर आणि इतर रसायने असतात, ज्यामुळे शरीरातील कार्बोहायड्रेट्स आणि साखरेचे पचन कमी होऊ शकते. आजच्या युगात खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि जीवनशैलीमुळे लोकांना अनेक आजार जडतात. अशा स्थितीत मधुमेहाच्या रुग्णांवरही मेथी खूप गुणकारी आहे. यामध्ये असलेले पोषक तत्व मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. लहान पिवळ्या बिया म्हणजे मेथी दाणे आपल्या भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध होणारा पदार्थ आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

असे अनेक घरगुती उपाय आहेत जे चांगले आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर ठरतात. यातलाच एक पदार्थ म्हणजे मेथीचे पाणी. मेथीचे पाणी दररोज रिकाम्या पोटी प्यायल्यास शरीराला एकच नाही तर अनेक फायदे होतात. मेथीमध्ये भरपूर फायबर असते. यामध्ये व्हिटॅमिन, आयर्न, मॅग्निशियम, आणि मँगनीज सारखे खनिजे आढळतात. मेथीचे पाणी प्यायल्याने कोणकोणते फायदे होतात ते जाणून घेऊयात.

हेही वाचा : लहान मुलांसाठी आहेत ‘ही’ ३ खास योगासने; सुदृढ शरीरासह लाभेल तल्लख बुद्धी आणि एकाग्रता

मेथीचे पाणी कसे तयार केले जाते ते जाणून घेऊयात. मेथीचे पाणी तयार करण्यासाठी एका ग्लासमध्ये पाण्यात एक चमचा मेथीचे दाणे टाकावेत. त्यानंतर ते पाणी रात्रभर भिजवून ठेवावेत. हे पाणी सकाळी उठल्यानंतर गाळून रिकाम्या पोटी प्यावे. हे पाणी तुम्ही थोडे कोमट करून देखील पिऊ शकता.याशिवाय अर्धा चमचा मेथीचे दाणे एक ग्लास पाण्यात उकळून देखील पिऊ शकता.

वजन कमी होते

मेथीचे पाणी प्यायल्याने भूक कमी होते. मेथीच्या पाण्यामुळे मेटाबॉलिक रेट वाढतो. ज्यामुळे फॅट बर्न होण्यास मदत होते.

पाचन सुधारते

अपचन,सूज आणि बद्धकोष्ठता यासारख्या पोटाच्या पचनक्रियेत अडथळा निर्माण झाल्यामुळे होतात. यासाठी पचनक्रिया चांगली राहण्यासाठी मेथीचे पाणी पिणे फायदेशीर ठरते. शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी देखील मेथीचे पाणी पिणे फायदेशीर ठरते. मेथीच्या पाण्यामुळे रक्तातील साखर कमी करू शकते.

हेही वाचा : त्वचा आणि केसांसाठी कोरफड व खोबरेल आहे फायदेशीर; होतात ‘हे’ फायदे

कोलेस्ट्रॉल कमी होते

वाईट कोलेस्ट्रॉलमुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. अशा स्थितीमध्ये वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मेथीचे पाणी पिणे उपयुक्त ठरू शकते. मेथीची पाणी शरीरातील एलडीएल कमी करते आणि शरीराचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. योग्य उपाय डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Digestion cholesterol weight loss many benifits of drinking fenugreek seeds water check deatils tmb 01