आजच्या काळात लोकांकडे जर कोणत्या गोष्टीची कमतरता असेल तर ती म्हणजे वेळ. काम आणि वेळेचे नियोजन करून लोक आयुष्यात संतलुन ठेवण्याचा प्रयत्न करतात. विशेषत: अशा महिला ज्या काम आणि ऑफिस सांभळतात किंवा गृहिणी ज्यांना सकाळी लवकर उठून सर्वांचे डब्बे वेळत द्यायचेअसतात. अशा महिलांना सकाळच्या डब्याची तयारी रात्रीपासूनच करावी लागते. त्यामुळे भाज्या चिरणे, निवडणे ही सर्व तयारी रात्रीच करतात. कित्येक लोक वेळ वाचवण्यासाठी रात्रीच पीठ मळून कणीक फ्रिजमध्ये ठेवतात आणि सकाळी त्याच कणकेच्या पोळ्या करतात. ही पद्धत वेळ कामाचा वाचवते पण तुम्हाला माहितीये का तुमची ही सवय आरोग्याच्या कित्येक समस्यांचे कारण ठरू शकते. विशेषत: जेव्हा पीठ-मळून दोन-तीन दिवस फ्रिजमध्ये ठेवलेले असते. दिर्घकाळ फ्रिजमध्ये ठेवलेल्या पिठाच्या पोळ्या करू नये असा सल्ला का दिला जातो हे जाणून घ्या

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फ्रिजमध्ये ठेवलेल्या पीठाच्या पोळ्या केल्यास आरोग्यावर काय परिणाम होतो?| Disadvantage of Keeping Dough In Fridge

एकदा पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवले की त्या कणेकत काही रसायने तयार होऊ लागतात ज्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे पीठ मळल्यानंतर सहा ते सात तासांपेक्षा जास्त काळ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नका.

हेही वाचा – रोज फळांचे सेवन का करावे? सद्गगुरूंनी सांगितले आश्चर्यकारक फायदे; काय आहे तज्ज्ञांचे मत?

किण्वन (फर्मेंटेशन)

कणकेमध्ये किण्वन प्रक्रिया लवकर होते. त्यामुळे पिठात बॅक्टेरिया आणि घातक रसायने तयार होऊ लागतात. अशा परिस्थितीत या पिठापासून बनवलेल्या पोळ्चायांचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

पोटदुखी

शिळ्या पोळ्या आणि पुऱ्या खाल्ल्याने जेवढे आरोग्याचे नुकसान होते तेवढेच नुकसान शिळ्या कणकेपासून बनवलेल्या पोळ्या, पुऱ्या किंवा पराठे खाल्ल्याने देखील होते. अनेक वेळाशिळे अन्न खाल्याने पोटदुखी, अन्नातून विषबाधा यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

हेही वाचा – लिंबू आणि मोहरीच्या तेलाचा ‘हा’ जुगाड गायब करु शकतो घराच्या कानकोपऱ्यातून मच्छर! हे घरगुती उपाय वापरुन पाहा

बद्धकोष्ठता

शिळ्या पिठाची पोळी खाल्ल्याने सामान्य लोकांनाही बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्यांनी शिळ्या पिठाच्या पोळ्या खाऊ नयेत.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disadvantage of keeping dough in fridge fermentation constipation abdominal pain snk
Show comments