दिवाळी २०२१ हा अतिशय महत्त्वाचा सण आहे. दिव्यांनी उजळून निघालेला हा उत्सव यावेळी गुरुवार, ४ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. नरक चतुर्दशीही याच दिवशी येते. दिवाळीत महालक्ष्मीची पूजा करण्याचा नियम आहे. या दिवशी लक्ष्मी, श्रीगणेश, सरस्वती आणि महाकाली यांच्या पूजेबरोबरच देवी पूजनही केले जाते. जाणून घ्या हा पवित्र सण का आणि कसा साजरा केला जातो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिवाळी हा सण का साजरा केला जातो?

पौराणिक मान्यतेनुसार, कार्तिक महिन्यात भगवान राम चौदा वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतले. या आनंदात अयोध्येतील लोकांनी दिवे लावून सण साजरा केला. तेव्हापासून दिवाळीचा सण सुरू झाल्याचे सांगितले जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर या राक्षसाचा वध करून देवतांना त्याच्या दहशतीतून मुक्त केले, अशीही मान्यता आहे. त्यामुळे कार्तिक चतुर्दशीला नरक चतुर्दशीचा सणही साजरा केला जातो.

( हे ही वाचा: हेल्दी फराळ: या दिवाळीत ट्राय करा ओट्स कोकोनट कुकीज; पाहा रेसिपी )

दिवाळीत लक्ष्मीला कसे प्रसन्न करावे?

लक्ष्मी देवीच्या आशीर्वादासाठी दीपावलीच्या दिवशी शयनकक्ष आणि पूजेच्या घरात हलकी अगरबत्ती लावा.

दिवाळीच्या दिवशी पूजा करताना धणे एका भांड्यात ठेवा आणि पूजेनंतर बागेत किंवा घरातील कोणत्याही भांड्यात पेरा. असे मानले जाते की असे केल्याने घरात नेहमी सुख-समृद्धी राहते.

दिवाळीच्या दिवशी घराची साफसफाई करा. यानंतर पूजेच्या ठिकाणी तुपाचा/ तेलाचा दिवा आणि घराबाहेर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.

या दिवशी माँ लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करावे.

दिवाळीच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर देवी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे लावणे शुभ मानले जाते.

दिवाळीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक लावणे शुभ मानले जाते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही रांगोळीचे स्वस्तिकही बनवू शकता.

( हे ही वाचा: Gold Silver: धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने-चांदीचा भाव किती? जाणून घ्या )

दिवाळीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर आंब्याचे किंवा केळीच्या पानांचे तोरण लावणे शुभ मानले जाते.

या दिवशी देवी लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी घराच्या मुख्य दारावर रांगोळी काढा.

दिवाळी पूजा शुभ मुहूर्त

लक्ष्मी पूजनाचा सर्वात शुभ मुहूर्त संध्याकाळी ६.९ ते रात्री ८.४ पर्यंत असेल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali 2021 do this things to impress mata lakshmi ttg