नरक चतुर्दशीला विशेष महत्त्व आहे. या दिवसाच्या विविध मूळ कथा आहेत, मुख्य म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय अशी ओळख या सणाची आहे. दिवाळी कार्तिक कृष्ण पक्ष चतुदर्शीला नरक चतुर्दशी साजरी केली जाते. काही वेळा हा दिवस लक्ष्मीपूजनाच्या दिवशी येतो.धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी विधिपूर्वक श्री हरी भगवान विष्णूची पूजा करावी.

काय आहे तारीख?

यंदा नरक चतुर्दशी आज गुरुवार ४ नोव्हेंबर २०२१ रोजी आली आहे.

( हे ही वाचा: Diwali 2021: नरक चतुर्दशी का साजरी केली जाते? जाणून घ्या पौराणिक कथा )

शुभ मुहूर्त कधी आहे?

अभ्यंग स्नान मुहूर्त – ४ नोव्हेंबर – ०५.४० ते ०६.०३

अभ्यंग स्नान चंद्रोदय – ४ नोव्हेंबर – ५.४०

चतुर्दशी तिथी ३ नोव्हेंबर रोजी ०९.०२ वाजता सुरू होईल

चतुर्दशी तिथी ४ नोव्हेंबर रोजी ०६.३ वाजता समाप्त होईल

सूर्योदय ०६.३४

सूर्यास्त ५.३४

( हे ही वाचा: Diwali 2021: मान्यतेनुसार दिवाळीत माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ‘हे’ नक्की करा! )

पूजा कशी करावी ?

या दिवशी भगवान हनुमान, भगवान कृष्ण, मां काली, भगवान शिव आणि भगवान वामन यांची पूजा केली जाते. या दिवशी १६ क्रिया म्हणजेच पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, दागिने, गंध, फुले, धूप, दीप, नेवैद्य, आचमन, तांबूल, स्तवपाठ, तर्पण आणि नमस्कार अशा क्रियांनी पूजा करावी असे मानले जाते. यानंतर कुंकू, अक्षता इत्यादी लावून धूप दिवा लावावा. त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवावा,आरती करावी.

Story img Loader