Diwali 2022 Cleaning : सध्या सगळीकडे दिवाळीची तयारी सुरू झाली आहे. भारतात सर्वत्र जल्लोषात दिवाळी साजरी केली जाते. लहान मुलांसह मोठ्यांचाही हा आवडता सण आहे. फ़राळ बनवण्याची गडबड, नवीन कपडे, घरातील वस्तुंची खरेदी अशा अनेक कामांमध्ये घराची साफसफाई करण्याची मोठी चिंता असते. वर्षातला हा सर्वात मोठा सण साजरा करण्याआधी प्रत्येक घरात साफसफाई केली जातेच. पण अशावेळी रोजची इतर काम सांभाळत साफसफाईसाठी वेगळा वेळ काढणे कठीण होते आणि संपूर्ण घराची सफाई करायची म्हटलं तर भरपूर वेळ लागतो. अशावेळी तुम्ही वेळ वाचवण्यासाठी काही टिप्स वापरू शकता. कोणत्या आहेत या टिप्स जाणून घ्या.
दिवाळीत घराची सफाई करताना वेळ वाचवण्यासाठी या टिप्स वापरा.
Weight Loss : वजन कमी करण्यासाठी मदत करू शकतात ‘ही’ पेयं; पाहा यादी
यादी तयार करा
सफाईला सुरूवात करण्यापुर्वी काय काय करायचे आहे याची एक यादी बनवा. त्यामुळे एखादी गोष्ट मध्येच आठवली आणि हातातल काम बाजुला ठेऊन आपण वेगळच काही करत बसलो अस होणार नाही. तसेच यादीमुळे कोणतही काम करायचं राहणार नाही.
एकावेळी एकाच खोलीची निवड करा
साफसफाई करताना जर तुम्ही एकावेळी संपूर्ण घराची सफाई करण्याचे ठरवले तर ते कमी वेळात पूर्ण होणे कठीण होईल आणि कामाचा ताण येईल. म्हणून सफाई करताना एकावेळी एकाच खोलीची निवड करून तिथलं काम व्यवस्थित पूर्ण करुन नंतर दुसऱ्या खोलीची सफाई करावी. एकाच दिवशी जास्त ताण येऊ नये यासाठी तुम्ही एका दिवसात एक खोली साफ करण्याचे ठरवू शकता.
कपाटापासून सुरूवात करा
रोजच्या कामाच्या गडबडीमध्ये कपाट आवरायला वेळ मिळत नाही, त्यामुळे जर दिवाळीची साफसफाई करताना पुरेसा वेळ असेल तर तुम्ही कपाट साफ करण्यापासून सुरूवात करू शकता.
स्वयंपाक घर पूर्णपणे स्वच्छ करा
अनेकवेळा आपण अधिकचे किराणा सामान आणून ठेवतो. इमर्जन्सीच्या वेळी हे सामान उपयोगी येईल असा विचार करून हे सामान आणले जाते. पण ते हळूहळू इतके साठते की इतर सामान ठेवायला जागा उरत नाही. अशावेळी संपूर्ण किचनची सफाई करणे गरजेचे असते. दिवाळीच्या साफसफाईमध्ये तुम्ही हे काम करू शकता. एक्सपायर झालेल्या पदार्थांना बाजुला काढुन तुम्ही सर्व सामान चेक करून कोणते सामान संपले आहे याची यादी बनवु शकता.
साफसफाई करताना या गोष्टी करणे टाळा
- लादी साफ करण्यापासून सुरूवात करू नका. पंखे, घरातील धुळ साफ करण्याआधी लादीने सफाईची सुरूवात करू नका. कारण नंतर बाकी सगळ्या गोष्टींची धुळ लादीवरच पडते.
- घरातील जुने सामान बाजुला काढून त्याची योग्य ती विल्हेवाट लावा. कारण तुम्ही कितीही साफसफाई केली तरी घरात जर सगळीकडे आवश्यक नसलेले जुने सामान असेल तर घर स्वच्छ आणि नीटनेटके दिसत नाही.
- साफसफाई करताना जुन्या कपडयांएवजी मायक्रोफायबर कपडयांचा वापर करा, कारण त्याने धुळ नीट स्वच्छ होते.
- फ्रिज, ओव्हन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील नीट स्वच्छ करून घ्या.