पुढच्या आठवड्यात दिवाळी सुरू होणार आहे. संपूर्ण देशात सध्या दिवाळीच्या तयारीची लगबग पाहायला मिळतेय. दिवाळीची पहिली अंघोळ म्हटलं की आठवते ते कडक्याच्या थंडीत पहाटे अंगाला तेल आणि उटणं लावून केलेले अभ्यंगस्नान. यानंतर नवीन कपडे घालून, तयार केलेल्या फराळावर ताव मारण्यात एक वेगळीच मजा असते. मात्र, दिवाळीला अभ्यंगस्नान का करतात हे तुम्हाला माहीत आहे का?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयुर्वेदात अभ्यंगस्नानाचे महत्त्व फार पूर्वीच सांगण्यात आले आहे. अभ्यंगस्नानाच्यावेळी वापरण्यात येणारे सुगंधी उटणे विविध नैसर्गिक घटकांपासून तयार केले जाते. एकप्रकारे हे आयुर्वेदिक स्क्रबच आहे. केवळ थंडीतच नाही तर वर्षाचे बाराही महिने आपण हे उटणे वापरू शकतो. उटण्यामुळे आपल्या त्वचेला अनेक फायदे होतात. हे फायदे कोणते आहेत ते जाणून घेऊया.

  • सुरकुत्या कमी होतात

वयानुसार त्वचेला येणाऱ्या सुरकुत्या पडू लागतात. उटण्यामुळे सुरकुत्या पडण्याचे प्रमाण कमी होते. हळदीमध्ये अ‍ॅन्टी एजिंग घटक असल्याने त्याचा त्वचेला फायदा होतो. त्वचा दीर्घकाळ तजेलदार आणि टवटवीत दिसते. याशिवाय उटण्यात मध किंवा दूध घातल्यास त्याचा जास्त फायदा होतो. यामुळे त्वचा मुलायम होण्यास मदत होते.

शतपावलीचा कंटाळा करणाऱ्यांनी एकदा ‘हे’ फायदे वाचाच; अनेक गंभीर आजारांवरही करता येईल मात

  • मुलायम त्वचा

दिवाळी हा सण थंडीच्या दिवसांत येतो. थंडीमुळे आपली त्वचा कोरडी होते. अनेकदा या कोरड्या त्वचेला खाज येण्याची समस्या जाणवते. या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी पूर्वीपासून उटण्याचा वापर केला जातो. उटण्यामधील आयुर्वेदिक घटकांमुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होऊन ती मुलायम होण्यास मदत होते. उटण्यामध्ये असणारी चंदन पावडर आणि हळद त्वचा उजळ बनवण्यास मदत करतात. त्यामुळे दिवाळीशिवायही इतर दिवशी, विशेषतः थंडीच्या दिवसात आठवड्यातून एकदा तरी उटण्याचा वापर जरुर करावा.

  • शरीरावरील अनावश्यक केसांची वाढ रोखण्यास उपयुक्त

चेहऱ्यावरील किंवा हाता-पायावरील केस जास्त वाढू नयेत यासाठी लहानपणी बाळाला आंघोळ घालताना मसुराच्या डाळीचे पिठ किंवा हरभरा डाळीचे पिठ लावले जाते. मात्र तरीही हे केस कमी न झाल्यास उटणे हा अतिशय उत्तम पर्याय ठरू शकतो. उटणे लावून गोलाकार पद्धतीने स्क्रब केल्यास शरीरावरील अनावश्यक केसांची वाढ थांबण्यास मदत होते.

Photos : यकृताचे आरोग्य सुधारण्यात ‘हे’ पदार्थ निभावतात सुपर फूड्सची भूमिका; आजच करा आहारात समावेश

  • चमकदार त्वचा

उटण्यामध्ये रक्तचंदन, वाळा, चंदन, वेखंड, कात, नागरमोथा यासारख्या वनस्पती आणि खोडांचा वापर केला जातो. हे घटक त्वचेवर स्क्रबर म्हणून काम करतात. यामुळे काळवंडलेली त्वचा उजळण्यास मदत होते. याशिवाय उटण्याच्याबरोबरीने त्वचेवर बेसन पीठही लावल्यास ते अधिक फायद्याचे ठरते. चंदनामुळे शरीराला थंडावा मिळतो

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali 2022 do you know benefits of ubtan utane it can be a panacea for many skin problems pvp