सध्या सर्वत्र दिवाळीची जोरदार तयारी सुरू आहे. वर्षातील सर्वात मोठा मानला जाणारा हा सण साजरा करण्यासाठी सगळेच खूप उत्सुक असतात. नवीन वस्तुंची खरेदी, फराळाचे वेगवेगळे पदार्थ बनवणे, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या भेटीगाठी घेणे यामुळे या दिवसांमध्ये आपण नेहमीपेक्षा जास्त व्यस्त असतो. त्यामुळे स्वतःसाठी तयारी करण्याचा वेळ मिळणे कठीण होते, प्रत्येक दिवसासाठीचा वेगळा लूक, त्यासाठीची तयारी आधीच करावी लागते. त्यातच दागिने या महिलांचा जिव्हाळ्याचा विषय. आपण घालणारे दागिने नव्यासारखे दिसावे असे प्रत्येक स्त्रीला वाटते. पण दागिने जुने झाल्यावर त्यांची चमक कमी होऊ शकते. यासाठी तुम्ही काही टिप्स वापरून दागिन्यांची चमक परत मिळवू शकता. कोणत्या आहेत त्या टिप्स जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डिशवॉशिंग पावडर
दागिन्यांमध्ये साचलेली घाण साफ करण्यासाठी डिशवॉशिंग पावडर मदत करू शकते. यासाठी कोमट पाण्यात डिशवॉशिंग पावडर मिसळून त्यात सोन्या – चांदीचे दागिने काही वेळासाठी ठेवा. त्यानंतर एखाद्या जुन्या टूथब्रशने हलक्या हाताने चोळा यामुळे दागिन्यांची चमक परत मिळवण्यास मदत होईल.

आणखी वाचा : लहान मुलांची दृष्टी सुधारण्यासाठी मदत करतात ‘हे’ पदार्थ; पाहा यादी

अमोनिया
अमोनिया देखील दागिन्यांची चमक परत मिळवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यासाठी कोमट पाण्यात अमोनिया टाकून त्यात थोड्या वेळासाठी सोन्या-चांदीचे दागिने भिजत ठेवा. त्यानंतर त्यांना या पाण्यातून बाहेर काढून ब्रशने हलक्या हाताने साफ करा. मोती किंवा इतर रत्न असणाऱ्या दागिन्यांवर अमोनिया वापरणे टाळा.

टूथपेस्ट
टूथपेस्ट चांदीच्या दागिन्यांना साफ करण्यासाठी उत्तम पर्याय मानले जाते. यासाठी चांदीच्या दागिन्यांवर टूथपेस्ट लावून १० मिनीटांसाठी तसेच ठेवा. त्यानंतर हे दागिने धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करून ब्रशने हळूवार घासा, यामुळे चांदीचे दागिने अगदी नव्यासारखे दिसू लागतील.

सिल्वर पॉलिश
सिल्वर पॉलिशचा वापर करून तुम्ही चांदीच्या दागिन्यांची चमक सहज परत मिळवू शकता. सिल्वर पॉलिश चांदीच्या दागिन्यांवर चोळा, त्यानंतर कॉटनचे कापड आणि कोमट पाणी वापरून दागिने स्वच्छ धुवून घ्या.

आणखी वाचा : रोज सकाळी उठल्यावर थकवा जाणवतो का? ‘या’ सवयी ठरतात कारण; लगेच करा बदल

मीठ
सोन्या – चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी मिठाचा देखील वापर करता येतो. यासाठी थोडे पाणी घेऊन त्यात चिमूटभर मीठ टाका, नंतर यामध्ये सोन्या -चांदीचे दागिने थोड्या वेळासाठी ठेवा. यामुळे दागिन्यांवर जमा झालेली घाण लगेच घालवता येईल.

या टिप्स वापरून तुम्ही जुन्या दागिन्यांची चमक परत मिळवू शकता. दिवाळीत घालणाऱ्या दागिन्यांसाठी या टिप्स वापरू शकता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali 2022 how to clean gold and silver jewellery at home use these helpful tips pns