दिवाळीत फराळ ही प्रत्येकाच्या आवडीची गोष्ट. वेगवेगळ्या प्रकारचे लाडू, मिठाई, शंकरपाळ्या, करंजी असे अनेक गोड पदार्थ बनवले जातात. अशा गोड पदार्थांवर ताव मारण्यासाठी खवय्ये मंडळी एका पायावर तयार असतात. पण मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना अशा पदार्थांच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची भीती वाटते. यावर काय उपाय करता येईल हे अनेकजणांना माहित नसते. काही टिप्स वापरून मधुमेह असणाऱ्या व्यक्ती रक्तातील साखरेच्या पातळीची चिंता न करता मनमुराद फराळ, मिठाई यांचा आस्वाद घेऊ शकतात. कोणत्या आहेतत त्या टिप्स जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करा
सणांच्या दिवसात सर्व घरांमध्ये चविष्ट पदार्थांची मेजवानी असते. अशात गोड खाण्याची इच्छा होणे स्वाभाविक आहे. पण मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना सर्व मिठाई खाता येत नाही. अशावेळी नवीन वेगवेगळे पदार्थ खाता येतील. यामुळे केवळ कार्बोहायड्रेट आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहणार नाही तुम्हाला वेगवेगळे फ्लेवर देखील ट्राय करता येतील. गोड खाण्याच्या क्रेविंगसाठी तुम्ही या वेळेस उपलब्ध असणारी फळं देखील खाऊ शकता.

रक्तातील साखरेची पातळी नियमित तपासा
सणांच्या दिवसांमध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. त्यात या दिवसांमध्ये सगळीकडे गोड पदार्थांची रेलचेल असते, असे पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी नियमितपणे रक्तातील साखरेची पातळी तपासणे गरजेचे आहे.

डॉक्टरांचा सल्ला घ्या
मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी कोणतेही गोड पदार्थ खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, यामुळे तब्बेतीवर दुष्परिणाम होणार नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मधुमेह असणाऱ्यांना त्यांचे आवडते पदार्थ खाता येतील.

शेंगदाणे, चणे अशा पदार्थांचा आहारात समावेश करा
शेंगदाणे, चणे, राजमा, मसूर हे कमी ग्लायसेमिक इंडेक्स असणारे पदार्थ आहेत. यांमुळे शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali 2022 how to control diabetes while being tempted by sweets during this festive season pns