Diwali 2023 : दिवाळी म्हणजे दिव्यांचा झगमगाट आणि दिव्यांचा सण म्हणजेच दिवाळी असं म्हटलं जातं. कारण दिवाळीत लोक आपल्या घरासमोर लाईटिंगच्या माळा आणि मंद उजळणाऱ्या पणत्यांची सजावट मोठ्या प्रमाणात करतात. यंदाची दिवाळी अगदी काही दिवसांवर येवून ठेपली आहे. दिवाळीसाठी बाजारपेठाही सज्ज झाल्या असून विविध प्रकारच्या पणत्या आणि लाईटिंगच्या माळांनी बाजारपेठा सजल्या आहेत. दिवाळीत पणत्या आणि लायटिंगच्या माळा असतातच, पण दिवाळीत सर्वात मोठा मान असणारी गोष्ट म्हणजे घरोघरी मोठ्या दिमाखात लावले जाणारे आकाशकंदील. प्रत्येकाच्या घरी वेगवेगळे आकाशकंदील लावले जातात. शिवाय काही लोक हे आकाशकंदील विकत न आणता आपल्या घरीच बनवतात. जर तुम्हालाही यंदाच्या दिवाळीत घरच्याघरी आकाशकंदील बनवायचे असतील, तर आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही सुंदर आणि कमी खर्चात घरीच आकाशकंदील बनवू शकता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कुटुंबातील लोक किंवा मित्रांबरोबर एकत्रितपणे एखादं काम करताना घरात एक वेगळ्याप्रकाचे आनंदी वातावरण निर्माण होते. शिवाय कोणतीही वस्तू घरी तयार करणं सध्याच्या इंटरनेटच्या काळात खूप सोपं झालं आहे. त्यामुळे विविध प्रकारचे डेकोरेशन करण्याच्या आयडियांपासून घरी आकाशकंदील तयार करण्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. जे पाहून तुम्ही घरीच आकाशकंदील तयार करू शकता. या व्हिडीओमध्ये काही टाकाऊ गोष्टींपासून टिकाऊ किंवा अगदी सहज उपलब्ध होतील अशा वस्तूंपासून आकाशकंदील कसा तयार करायचा हे दाखवलं आहे ते पाहूया.

हेही पाहा- ६० सेकंदात परफेक्ट पदर लावण्यासाठी बेस्ट जुगाड! दिवाळीच्या साड्यांना येईल अगदी सुंदर लुक, पाहा Video

सध्या सोशल मीडियावर colours_creativity_space नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरचा एक खूपच आकर्षक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने आकाशकंदील कसा बनवायचा हे दाखवलं आहे. यामध्ये एक पेपर बॉक्स आणि विविध पेपरपासून खूप सुंदर असा आकाशकंदील तयार केला आहे.

batti_creative_world नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून रंगीत कागदापासून साधा आणि पटकन तयार होणारा आकाशकंदील कसा तयार करायचा हे दाखवलं आहे.

घरच्या घरी आकाशकंदील तयार करण्याच्या सोप्या पद्धती –

  • हँडमेड पेपरपासून आकाशकंदील बनविण्याचा ट्रेंडही सध्या सुरू आहे. यामध्ये विविध रंगांचे आणि डिझाईनचे हँडमेड पेपर आपण वापरू शकतो. त्याशिवाय त्याला आपल्या आवडीची लेस लावली किंवा इतरही काही सजावट केली तर तो दिसायलाही आकर्षक दिसतो.
  • कार्डशिटपासून फोल्डिंगचा उत्तम असा आकाशकंदील आपल्याला तयार करता येतो. हा आकाशकंदील फोल्ड करणे शक्य असल्याने तो अनेक वर्षांपर्यंत वापरता येतो. यासाठीही खूप कमी खर्च येतो. शिवाय प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार त्याची सजावट करू शकतो. यामध्ये तुम्ही लग्नत्रिकांच्या कागदाचाही चांगल्या पद्धतीने वापर करू शकता.
  • आकाशकंदील सजवण्यासाठी घरात असणारी एखादी लेस, साडीचे काठ, वेगवेगळ्या प्रकारची बटणे आणि टिकल्यांचा वापर करता येवू शकतो. याशिवाय सध्या बाजारातही सजावटीसाठी अनेक वस्तू मिळतात. त्यांचा वापर करून आपण अतिशय सुंदर आणि भन्नाट असे आकाशकंदील बनवू शकतो.

आकाशकंदील कसा बनवायचा हे सांगणारे सोशल मीडियावरील आणखी काही व्हिडीओ –

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali 2023 make lanterns at home from boxes and paper check out these easy tips see video jap