Diwali cleaning Tips: भारतामध्ये प्रत्येक सण आनंद अन् उत्साहात साजरा केला जातो. त्यातच दिवाळी म्हटलं की, अनेक जण एक महिना आधीपासून तयारीला सुरुवात करतात. दिवाळीसाठी नवीन कपडे, दिवे, रोषणाई, फटाके, दागिने या वस्तूंच्या खरेदीसह विविध पदार्थ बनविण्यास सुरुवात होते. पण, या सगळ्यात सर्वांत महत्त्वाची व तितकीच अनेकांना कंटाळवाणी वाटणारी गोष्ट म्हणजे दिवाळीची साफसफाई; जी दिवाळीसाठी करावीच लागते.

खरं तर, दिवाळीला घराची अगत्यानं साफसफाई का केली जाते? तर, दिवाळीत देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. हे त्यामागचं धार्मिक कारण आहे. धार्मिक शास्त्रानुसार, देवी लक्ष्मी त्याच घरात निरंतर वास करते, जिथे स्वच्छता आणि सुंदर वातावरण असते. देवी लक्ष्मीला स्वच्छता खूप प्रिय आहे. तसेच जिथे अस्वच्छता असते, तिथे अलक्ष्मीचा वास असतो. अलक्ष्मी म्हणजे दुःख आणि दारिद्र्यता.

Safety demonstration at fuel storage depot in Miraj sangli news
मिरजेतील इंधन साठवण आगारात सुरक्षा प्रात्यक्षिक
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
winter kitchen tips 5 time saving breakfast hacks
Winter Kitchen Tips : हिवाळ्यात नाश्ता बनवताना आळस येतोय? मग वापरा ‘या’ ५ स्मार्ट कुकिंग टिप्स
way of chopping and cleaning methi leaves
मेथीची भाजी खायला आवडते; पण साफ करायचा कंटाळा येतो? मग ‘या’ सोप्या टिप्सच्या मदतीने भाजी चुटकीसरशी करा साफ
bmc plans to concrete all roads but residents oppose concreting in their area
आम्हाला काँक्रिटिकरण नको, वांद्रे आणि मरीन ड्राईव्हच्या राहिवाशांची मागणी
Palghar Police conducts special awareness campaign on the occasion of Road Safety Week
शहरबात: रस्ते आणि सुरक्षा
dombivli municipal corporation loksatta news
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात पालिकेच्या स्वच्छता दुतांच्या उपद्रवाने नागरिक हैराण
शिवाजी पार्क मैदानातील धुळीवर नियंत्रणासाठी आता वाऱ्याच्या वेगाचा अभ्यास; आयआयटी मुंबई येथील पर्यावरण तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार दीर्घकालीन उपाययोजना

पण, हल्लीच्या धकाधकीच्या आयुष्यात नोकरी करणाऱ्या महिलांना संपूर्ण घराची साफसफाई करणं खूप कठीण जातं. अनेक जण तर फक्त वर्षातून एकदाच म्हणजे दिवाळीतच साफसफाई करतात. त्यामुळे वर्षभराचा पसारा एकदम काढावा लागतो. साफसफाईनंतर हा पसारा आवरायचा आणि पुन्हा तो लावायचा. या सर्व बाबींमुळे परिणामत: अनेकांना खोकला, सर्दी, कंबरदुखीचा सामना करावा लागतो. पण, आज आम्ही तुमच्यासाठी अशा काही खास टिप्स घेऊन आलो आहोत; ज्याच्या मदतीने तुम्ही संपूर्ण घराची साफसफाई अगदी पटापट करू शकता.

अशी करा दिवाळीची साफसफाई (Diwali Home Cleaning)

ज्यांना धुळीचा त्रास होतो, त्यांनी घर साफ करताना डोळ्यांवर गॉगल आणि तोंडावर मास्क लावावा; जेणेकरून धूळ नाक-तोंडात जाणार नाही. तसेच हातात ग्लोव्हज घालावेत.

प्रत्येक वेळी सफाईची सुरुवात सिलिंगवरील जळमटं काढण्यापासून करावी. त्यानंतर घरातील पंखे, दरवाजे, खिडक्या, भिंती, ग्रिल स्वच्छ करून घ्यावं.

त्यानंतर घरातील अडगळीत पडलेल्या वस्तू म्हणजे चप्पल, तुटलेली जुनी भांडी, रद्दी, फाटलेले कपडे, खराब फर्निचर, नको असलेली पुस्तकं, खेळणी, मुदत संपलेली औषधे-गोळ्या, जुनी सौंदर्य उत्पादने ज्यांचा वापर तुम्ही करीत नसाल अशी आणि बंद पडलेल्या विजेवरील वस्तू या सर्व गोष्टी फेकून द्याव्यात.

वापरात न येणारी; पण गरजेची चांगल्या स्थितीतील भांडी एका मोठ्या पोत्यात एकत्र घालून ठेवा. मग त्यांचा वापर तुम्ही भविष्यात करू शकाल आणि स्वयंपाकघरातील भांड्यांचा पसारा कमी होईल.

हेही वाचा: धातूचा चमचा मधात ठेवणे विषारी ठरू शकते? तज्ज्ञ काय सांगतात…

तसेच स्वयंपाकघरातील साफसफाई करताना खराब झालेले मसाले, डाळी फेकून द्या.

अशा प्रकारे तुमचे बेडरूम आणि टॉयलेट, बाथरूमही साफ करून घ्या. तसेच घरातील खिडकीत किंवा बाल्कनीतील झाडे सुकलेली असतील, तर ती फेकून द्यावीत. त्या ठिकाणी नवीन रोपे लावावीत.

शेवटी संपूर्ण घरातील फरशी स्वच्छ धुऊन घ्या.

अशा पद्धतीने घर साफ केल्यास एक ते दोन दिवसांमध्ये संपूर्ण घराची साफसफाई तुम्ही सहजरीत्या करू शकाल.

Story img Loader