bhau beej 2024 : भाऊबीज हा सण कार्तिक महिन्याच्या शुल्क पक्षाच्या दुसऱ्या तिथीला साजरा केला जातो. बहिण- भावाच्या नात्यातील आपुलकी जपणारा हा सण खूप खास मानला जातो. या दिवशी बहिण भावाचे औक्षण करते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. त्या बदल्यात भाऊ बहिणीला ओवाळणी देतो, तसेच बहिणही भावाला गिफ्ट देते. दरवर्षी दिवाळीच्या दोन दिवसांनी (Bhaubeej 2024 Tithi and shubh muhurta) साजरा केला जातो. यावर्षी भाऊबीज ३ ऑक्टोबर रोजी रविवारी (Bhaubeej 2024 Date and Time) साजरी केली जात आहे. गुगलवर पण सध्या Bhaubeej हा किवर्ड मोठ्याप्रमाणात ट्रेंड होत आहे. पण महाराष्ट्रात हा सण जरी ‘भाऊबीज’ या नावाने ओळखला जात असला तरी वेगवेगळ्या राज्यांमध्ये या सणाला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. त्यामुळे भारतातील विविध राज्यांमध्ये या सणाला कोणत्या नावाने ओळखले जाते हे जाणून घेऊ…

१) महाराष्ट्र

महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यात मराठी आणि कोकणी भाषिक समुदायांमध्ये हा सण भाऊबीज, भाव बीज किंवा भाई बीज या नावाने ओळखला जातो. महाराष्ट्रात भाऊबीजेच्या दिवशी भावाला रंगोळी काढून सजवलेल्या चौकोनी पाटावर बसले जाते. यानंतर त्याचे औक्षण करुन त्याला गोडधोड भरवले जाते. अशाप्रकारे त्याच्या दीर्घायुष्य व उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली जाते. यावेळी बहिण भावाला आणि भाऊ बहिणीला गिफ्ट्स देतो.

Diwali 2024 reuse flowers and diya trending jugad video goes viral
VIDEO: दिवाळीनंतर सुकलेली फुलं आणि गूळ पाण्यात नक्की टाकून पाहा; परिणाम पाहून तुम्हीही अवाक् व्हाल
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Khar Gymkhana Cancel Cricketer Jemimah Rodrigues Membership
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जचं खार जिमखाना सदस्यत्व रद्द; वडिलांतर्फे आयोजित धार्मिक कार्यक्रमांमुळे कारवाई
Benefits of Sunflower Seeds for hair
Sunflower Seeds For Hair : केस खूप गळतात? मग सूर्यफुलाच्या बियांचा करा वापर, सगळ्या समस्या होतील झटक्यात दूर
Sharad Pawar on Manvat Murders Case
Video: ‘मानवत मर्डर’ माझी पहिली केस’ शरद पवारांनी उलगडला १९७२ चा थरार; पोलीस अधिकारी रमाकांत कुलकर्णींबद्दल म्हणाले…
devendra fadnavis on amit thackeray
अमित ठाकरेंच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात, “राज ठाकरेंनी या एका जागेवर…”
Illegal Entry In US
Illegal Entry In US : वर्षभरात अमेरिकेत बेकायदेशीर मार्गाने घुसखोरी करणाऱ्या ९० हजार भारतीयांना अटक; ‘या’ राज्यातील लोकांची सर्वाधिक संख्या
Diwali Padwa bali pratipada 2024 Wishes In Marathi hd photo
Diwali Padwa 2024 निमित्त नातेवाईक, मित्रमंडळींना पाठवा ‘या’ खास मराठी शुभेच्छा; हटके HD फोटो, Messages, Whatsapp Status पाठवून करा खूश
Bhau beej 2024 google trend
भाऊबीज २०२४ गुगल ट्रेंड

२) बिहार

भाऊबीजेच्या दिवशी बिहारमध्ये एक अनोखी परंपरा पाळली जाते. या दिवशी बहिणी भावाला फटकारतात आणि चांगले वाईट बोलतात नंतर माफी मागतात. भावांनी भूतकाळात केलेल्या चुका सुधारण्यासाठी ही परंपरा पाळली जाते. यानंतर बहिणी भावाला औक्षण करुन मिठाई भरवतात.

३) उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशात हा सण ‘भाई दूज’ नावाने ओळखला जातो. यानिमित्ताने बहीण भावाचे औक्षण करुन साखरेचे बत्तासे खाऊ घालते. उत्तर प्रदेशात भाऊबीजेला सुक खोबरं देण्याची परंपरा आहे.

४) पश्चिम बंगाल

पश्चिम बंगालमध्ये भाऊबीज हा सण ‘भाई फोटा’ या नावाने ओळखला जातो. या दिवशी बहिणी भावासाठी उपवास ठेवतात. भावाचे औक्षण करु मग उपवास सोडतात. औक्षणानंतर भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो.

५) नेपाळ

नेपाळमध्ये ‘भाई तिहार’ म्हणून प्रसिद्ध आहे. तिहार म्हणजे कपाळावर लावला जाणारा कुंकवाचा टिका. याठिकाणी भाऊबीज भाई टिका नावाने साजरा करतात.