भाऊबीज हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक आहे. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी हा सण साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावांना टिळक लावतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदी आयुष्यासाठी प्रार्थना करतात. यावेळी ६ नोव्हेंबरला भाऊबीज साजरी होणार आहे. भाऊबीजे निमित्त तुमच्या नातेवाईकांना, मित्र परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी काही खास शुभेच्छा, संदेश.
शुभेच्छा संदेश
सण प्रेमाचा, सण मायेचा,
सण भावाबहिणीच्या, पवित्र नात्याचा
भाऊबीजेच्या शुभेच्छा!!
सण बहिण भावाचा …
सण सौख्याचा …
भाऊबीजेच्या शुभेच्छा!!
माझ्याशी रोज भांडतोस
पण दर भाऊबीजेला साठवलेल्या पैशांनी
मला हवं ते गिफ्ट नेहमी आणतोस.
( हे ही वाचा : Diwali 2021: जाणून घ्या, भाऊबीजेचा शुभ मुहूर्त, महत्व आणि पौराणिक कथा )
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण,
लाख लाख शुभेच्छा तुला आज आहे
बहीण भावाचा पवित्र सण…
भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा!
कधी नकोय काही तुझ्याकडून,
फक्त तुझी साथ हवीय
तुझी साथ ही दिवाळीच्या
मिठाई पेक्षा गोड आहे
दिवाळीच्या प्रेमळ शुभेच्छा!
पहिला दिवा आज लागला दारी
सुखाची किरणे येई घरी
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!!
तू पाठीशी असताना आभाळदेखील ठेंगणं वाटतं,
तुझ्या केवळ असण्याने मला आनंदाचं भरतं येतं.
दादा तुला भाऊबीजेच्या आभाळभर शुभेच्छा!!
जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक
उजळत राहू दे!
भावा-बहिणीची साथ
आयुष्यभर अतूट राहु दे
भाऊबीजेच्या शुभेच्छा!
बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात…
ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
(क्रेडीट: सोशल मीडिया )