Diwali diya jugaad: दिवाळी सणाची अनेक लोक आतूरतेने वाट पाहात असतात. दिवाळीला नव्या वस्तू आणि कपडे अनेक लोक खरेदी करतात. दिवाळीमध्ये आकर्षक दिव्यांनी केलेल्या रोषणाईने आणि घराबाहेर काढलेल्या रांगोळ्यांने मन प्रसन्न होते.दिवाळीमध्ये दिव्यांना अनन्यसाधारण असे महत्त्व असतं. लक्ष लक्ष दिव्यांनी सगळा परिसर उजळून निघत असतो.पण, या दिव्यांसोबत दिवाळीआधीच एक असा उपाय करायचा आहे; जो दिवाळीत तुमच्या मोठ्या फायद्याचा ठरेल. पणत्यांच्या एका जुगाडचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दिवाळीआधी पणतीचा हा व्हिडीओ पाहिला, तर दिवाळीत तुम्हाला याचा मोठा फायदा होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दिवाळीत लोक दिवे लावतात. तसेच दरवर्षी दिवाळीत नव्या पणत्या घेतल्या जातात; पण त्यासोबतच जुन्या पणत्याही लावल्या जातात. अनेक जण गेल्यावर्षीच्याच पणत्या दिवे वापरतात मात्र नव्यासारखी चमक त्यांना राहत नाही त्यामुले बऱ्याच जणी ते टाकून देतात. मात्र जुन्या पणत्या वापरण्याआधी त्या एकदा कुकरमध्ये ठेवा, असा सल्ला एका महिलेने दिला आहे. या हटके जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. गृहिणींकडे बरेच भन्नाट असे घरगुती जुगाड असतात. काही गृहिणी सोशल मीडियावर हे जुगाड शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा जुगाड सध्या खूप व्हायरल होतोय. याचा परिणाम पाहून तुमचाही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

नेमकं काय करायचं?

आता याचा फायदा काय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. महिलेने व्हिडीओत सांगितल्यानुसार तुम्हाला कुकरमध्ये पाणी गरम करायचं आहे. त्यात जुन्या पणत्या टाकायच्या आहेत. कुकरचं झाकण बंद करून थोडं गरम करून घ्यायचं. गॅस बंद करून कुकर थंड झाला की त्यातील पणत्या काढून त्या पाण्याने धुवून घ्या. यामुळे जुने चिकट झालेले दिवे, तुम्हाला पुन्हा वापरता येतील.या जुगाडामुळे तुम्हाला आता दरवर्षी दिवाळीला नवे दिवे घेण्याची गरज नाही. तुम्ही अशा प्रकारे दिवे स्वच्छ करून, दिवाळीला रोषणाई करू शकता.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> गॅसवर दिवा ठेवताच कमाल झाली; दिवाळीआधी पणतीचा ‘हा’ VIDEO जरूर पाहा, दिवाळीत होईल मोठा फायदा

@Puneritadka यूट्यूब अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम कसा वाटला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.