Kitchen Jugaad Video: आपल्या देशात साजऱ्या होणाऱ्या सणांपैकी दिवाळी हा सर्वांत मोठा सण. दिवाळीचा सण अगदी उत्साहात आणि मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. दिवाळी हा रोषणाईचा सण, आपण असंख्य दिवे लावतो. तसेच पूजेमध्ये समई, निरांजन, पणती, दिवे असे नानाविध प्रकारांचा समावेश करतो. रोषणाई आकर्षक व्हावी, यासाठी लामणदिवा, दीपमाळा असे दिव्यांचे अनेक प्रकार पूजेमध्ये अंतर्भूत केले जातात. पण या दिव्यांसोबत दिवाळीआधीच एक असा उपाय करायचा आहे. जो दिवाळीत तुमच्या मोठ्या फायद्याचा ठरेल. पणत्यांचा या जुगाडचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. दिवाळीआधी पणतीचा हा व्हिडीओ पाहिला तर दिवाळीत तुम्हाला याचा मोठा फायदा होईल.

दिवाळीत लोक दिवे लावतात. तसं दरवर्षी दिवाळीत नव्या पणत्या घेतल्या जातात पण त्यासोबतच जुन्या पणत्याही लावल्या जातात. पण या जुन्या पणत्या वापरण्याआधी त्या एकदा गॅसवर ठेवा असा सल्ला एका महिलेने दिला आहे. या हटके जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. गृहिणींकडे बरेच घरगुती भन्नाट जुगाड असतात. काही गृहिणी सोशल मीडियावर हे जुगाड शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा जुगाड सध्या खूप व्हायरल होतोय.

दिवाळीत होईल मोठा फायदा

आता याचा फायदा काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.महिलेनं दाखवल्यानुसार मातीच्या पणत्या घ्यायच्या आहेत. त्या गॅसवर थोड्या गरम करून घ्यायच्या आहेत. नंतर एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात गॅसवर गरम केलेले दिवे टाका. तुम्ही पाहाल तर पणत्यांवरील काळपटपणा निघून जाईल. फक्त स्क्रब घेऊन तुम्ही याच पाण्यात हा दिवा घासून घ्या. या जुगाडामुळे तुम्हाला आता दरवर्षी दिवाळीला नवे दिवे घेण्याची गरज नाही, तुम्ही अशाप्रकारे दिवे स्वच्छ करुन दिवाळीला रोषणाई करु शकता.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Kandil making at home: स्वस्तात मस्त! घरच्या घरी बनवा आकर्षक कंदील, या दिवाळीत वापरा ‘ही’ सोपी पद्धत आणि वाचवा पैसे

@Puneritadka यूट्यूब अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.