कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा असे म्हणतात. या दिवशी दानशूर अशा बळीराजाची पूजा करण्यास सांगितली आहे. ज्याप्रमाणे चैत्र शुक्ल प्रतिपदेस शालिवाहन शक नवे संवत्सर सुरु होते, त्याप्रमाणे कार्तिक शुक्ल प्रतिपदेस विक्रम संवत्सर सुरु होते. पंचांगकर्ते दाते यांनी दिलेल्या माहितीनुसार व्यापारी वर्षास यादिवशी सुरुवात होत असल्याने वहीपूजन, दुकानाची पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. या दिवशी पत्नीने पतीस ओवाळावे म्हणजे दोघांचे ही आयुष्य वाढते. यादिवशी पतीने पत्नीला ओवाळणी म्हणून सोने, साडी किंवा एखादी मोठी भेटवस्तू देण्याची पद्धत आहे. बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडव्यानिमित्ताने तुमच्या नातेवाईकांना, मित्र परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी काही खास शुभेच्छा, संदेश.
शुभेच्छा संदेश
प्रत्येक ठिकाणी आहे झगमगाट, पुन्हा आला प्रकाशाचा सण, तुम्हाला आमच्या आधी कोणी शुभेच्छा देण्याआधी आमच्याकडून दिवाळी पाडव्याचा हा आनंदी संदेश.
कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा, दिवाळीचा पाडवा आणतो नात्यात गोडवा, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना मनःपूर्वक शुभेच्छा!
साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे! उत्तम दिनाचे महात्म्य आहे! सुखद ठरो हा छान पाडवा, त्यात असूदे अवीट गोडवा!
आपण सर्वांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच सदिच्छा!
आज बलिप्रतिपदा, दिवाळीचा पाडवा. राहो सदा नात्यात गोडवा.
( हे ही वाचा: साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणजे बलिप्रतिपदा: जाणून घ्या महत्त्व,कथा आणि शुभ मुहूर्त )
तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या नात्यासाठी पाडवा हा खास
णतीचा उजेड अंगणभर राहू दे, लक्ष्मीचा वास घरोघर राहू दे
माझ्यासाठी जिथे तू तिथेच आहे घर, तुझा सहवास जन्मभर राहू दे – दिवाळी पाडवा शुभेच्छा!
तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या नात्यासाठी पाडवा हा खास
( हे ही वाचा: Vastu Tips: दिवाळीच्या दिवशी घरात आवर्जून करा ‘या’ पाच गोष्टी )
पहिला दिवा लागेल दारी, सुखाचा किरण येईल घरी
पूर्ण होवोत तुमच्या साऱ्या इच्छा, तुम्हा सर्वांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
दिवाळीमध्ये होतो दिव्यांचा साक्षात्कार, होतो आनंदाचा वर्षाव
दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने यश आणि आनंद मिळो सर्वांना
आला पाडवा, चला सजवूया रांगोळ्याच्या आराशी,
इच्छित लाभो मनी असे ते, सुखही नांदो पावलाशी – दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
तेजोमय दीप तेवावा आज तुमच्या अंगणी,
तेजोमय प्रकाश पडावा सदैव तुमच्या जीवनी – बलिप्रतिपदा शुभेच्छा!
(क्रेडीट: सोशल मीडिया )