Diwali Special Recipes: काय मग मैत्रिणींनो दिवाळीच्या तयारीला सुरुवात केली ना? यंदा किचनमध्ये कोणते नवे प्रयोग करायचं ठरवलंय. तसं पाहायला गेलं तर प्रत्येक गृहिणी ही तिच्या किचनची राणीच असते. अगदी ज्यांना रोजच्या जेवणाची हौस नसेल त्यांनाही दिवाळीचा फराळ म्हणताच हुरूप चढतो. चकली, शंकरपाळ्या या पारंपरिक पदार्थांसह कधी मॉडर्न शैलीच्या करंज्या, वेगवेगळ्या बर्फीचे प्रकार, गोडाला पर्याय म्हणून चटपटीत भुजिया करणार असाल किंवा अगदी चिरोटे, अनारसे असा बेत असेल तरी सर्वात आधी तयारी महत्त्वाची आहे. हे पदार्थ बनवायला घेतल्यावर अरे देवा हे राहिलं ते घरातच नाही असं म्हणायला लागू नये म्हणून आधीच किराणा सामानाची यादी बनवण्याचा सल्ला स्मार्ट गृहिणी देतात.

यंदा तुमचे थोडेसे कष्ट कमी करण्यासाठी आम्ही आपल्याला तयार यादी देत आहोत. यामध्ये अर्थात तुमच्या आवडी निवडी व गरजांनुसार आपण अन्य पदार्थ समाविष्ट करूच शकता पण दिवाळीच्या संपूर्ण फराळात बनणाऱ्या विविध पदार्थांसाठी या ५ वस्तू तुम्ही यादीत आवर्जून नमूद कराव्यातच. शिवाय या वस्तूंवर पैसे कसे वाचवायचे हे ही आपण पाहणार आहोत, चला तर मग…

rheumatoid arthritis, Health Special, rheumatoid ,
Health Special : रूमटोईड आर्थरायटिसची व्याप्ती किती असते?
Is waking up late better than rising early? A neurologist breaks it down for us Sleep tips
लवकर उठण्यापेक्षा उशिरा उठणे चांगले? वाचा न्यूरोलॉजिस्ट काय…
Refined Oil Vs Cold Pressed Oil: Which Is Healthier For Cooking? know everything health tips
रिफाइंड तेल वापरायचे की घाण्याचे? स्वयंपाक आणि तब्येतीसाठी कोणतं तेल योग्य कसं ठरवणार? जाणून घ्या
kitchen tips in marathi clean toilet with knife used in toilet cleaning tips Kitchen Jugaad Video
Kitchen Jugaad: टॉयलेटमध्ये एका चाकूची कमाल; मोठ्या समस्येवर उपाय, काय ते VIDEO मध्ये पाहाच
Multani Mitti use
मुलतानी मातीचा सतत वापर करणे फायदेशीर आहे का? तज्ज्ञांचे मत काय..
Health Special Stomach gas causes symptoms and control measures hldc
Health Special: पोटातील गॅस: कारणे, लक्षणे आणि नियंत्रण उपाय  (भाग १)
What changes does arthritis cause in the body
Health Special: आर्थरायटिसमुळे शरीरात काय बदल होतात?
Health Special, water to drink in monsoon, water,
Health Special: पावसाळ्यातील कोणते पाणी प्यावे? कोणते पिऊ नये?
Health Benefits of Daily Hugs
तुम्ही दररोज किती वेळा मिठी मारता? जाणून घ्या, मिठी मारणे हे आरोग्यासाठी कसे फायदेशीर?

१) तूप/ डालडा: डालडा म्हणजे वनस्पती तूप सहसा तुपाचे पदार्थ म्हणजे दिवाळीची खरी रंगत असे मानले जाते. पण मुळात काही वेळा तुपात थोडा डालडा घातल्यावर लाडू वळायला, सारण खुसखुशीत व्हायला मदत होते. शिवाय पैसेही वाचतात. त्यामुळे आपण यादीत तुपासह अर्धा एक (गरजेनुसार) किलो डालडाही जरूर घ्यावा.

२) रवा: लाडूसाठी, करंजीच्या सारणासाठी, करंजीच्या कणकेसाठी, अनारसे बनवताना रवा वापर होतो, अन्यही अनेक पदार्थ बनवताना रवा हाताशी असेल तर फायद्याचे ठरते. म्हणूनच दिवाळीच्या सामानात रवा घ्यायला विसरु नका.

३) चणा डाळ किंवा तयार बेसन: बाजारातून बेसन घेताना त्यात भेसळ ओळखणे मोठे कठीण असते. अशावेळी सुरक्षित बाजू म्हणजे तुम्ही थेट किलो भर चणा डाळ आणून ती हलकी भाजून मग दळून बेसन तयार करून घेऊ शकता. तयार बेसनाच्या तुलनेत हे स्वस्त व आरोग्यासाठी फायद्याचे ठरते. तसेच अनेक तिखट पदार्थांमध्ये भाजणीचा वापर केला आपण विविध डाळी घेऊन घरीच भाजणी बनवू शकता.

Diwali 2022: दिवाळीचे अभ्यंगस्नान, लक्ष्मीपूजन ते भाऊबीज सर्व मुख्य तिथी, शुभ मुहूर्त व महत्त्व जाणून घ्या

४) सुका मेवा: दिवाळी सारखी येत नाही मित्रांनो, त्यामुळे सुका मेवा म्हणजेच काजू, बदाम, खारीक, मनुका, बेदाणे अनेक घरात आणले जातात. अशावेळी होलसेल मार्केट मधून खरेदी करणे बजेट फ्रेंडली ठरेल. एकदाच घेतलेला सुका मेवा तुम्हला फराळाच्या सर्वच पदार्थांमध्ये पुरेसा ठरू शकतो. शिवाय जर उरलाच तर भविष्यातही वापर होऊ शकतोच.

५) पिठीसाखर व मैदा: या दोन्ही गोष्टी एकत्र लिहिण्याचं कारण म्हणजे बहुतांश वेळा या वस्तुतच गल्लत होते. दिसण्यावरून या वस्तू सारख्या असल्याने गोंधळ होतो. पण पिठीसाखर व मैदा हाताशी असेल तर सर्वच पदार्थांमध्ये वापर होतो. आपण साखरेच्या ऐवजी गूळही वापरू शकता, हा एक बदल आरोग्य व पैसे वाचवण्यासाठी फायद्याचा ठरू शकतो.

तुमच्या किचन टिप्स कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. दिवाळीच्या आधीच खूप खूप शुभेच्छा!