दिवाळीसणाचा उत्साह साजरा करण्यासाठी जगभर फटाक्यांचा वापर होत असतो. भारतात प्रामुख्याने दिवाळीत फटाके सर्वाधिक वापरले जातात. मात्र जर फटाक्यांचा वापर योग्य देखरेख किंवा मार्गदर्शनाखाली न केल्यास त्वचा आणि डोळ्यांना दुखापत होण्याची शक्यता अधिक असते. या डोळ्यांच्या दुखापतीमुळे दृष्टीला गंभीर आणि न भरून निघणारे नुकसान होऊ शकते. दिवाळीत रुग्णालयांत येणाऱ्या दुखापतग्रस्त रूग्णांमध्ये फटाक्यामुळे झालेल्या अपघातांची संख्या दरवर्षी वाढलेली दिसते. फटाक्यांची मजा घेताना डोळ्यांवर सुरक्षात्मक कवचाचा वापर करण्याविषयी तसेच संरक्षणाबाबत उदासीनता असल्याने दुखापतींची संख्या वाढली आहे.
दिवाळी दरम्यान अशा प्रकारच्या अपघातात लहान वयाची मुले दुखापतग्रस्त झालेली दिसतात. जबाबदार प्रौढांच्या निगराणीखाली फटाके न लावणारी बालके मोठ्या प्रमाणावर अपघातग्रस्त होतात.फटाक्यांमुळे पापण्या आणि डोळ्याच्या बाहुलीला केमिकल तसेच थर्मल बर्न होतो. ज्यामुळे डोळ्यांच्या पटलाला इजा होऊन कायमचा आंधळेपणा येऊ शकतो. बऱ्याचदा डोळ्यावर पडणाऱ्या प्रकाशामुळे ग्लोब परफोरेशन आणि इंट्रा ऑक्यूलर फॉरेन बॉडीजची तक्रार उद्भवते. ज्यामुळे दृष्टी कायमची जाऊ शकते, असे प्रा. डॉ. एस नटराजन यांनी सांगितले.
( हे ही वाचा: Diwali 2021: जाणून घ्या, नरक चतुर्दशीचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधी )
प्रो डॉ एस नटराजन, प्रमुख, व्हिट्रिओ रेटीनल सर्विसेस, डॉ. अगरवाल ग्रुप ऑफ आय हॉस्पिटल, मुंबई यांनी दुखापत झाल्यास काय करावे याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती सांगितली आहे.
त्यामुळे दिवाळी साजरी करताना आणि फटाके हाताळताना संरक्षक आय गिअर लावण्याचा मोलाचा सल्ला देण्यात येतो. त्याचप्रमाणे लहान मुलांना फटाके लावण्यास मनाई करावी. त्यांनी हट्ट केल्यास, मोठ्यांच्या निगराणीखाली फटाके वापरण्यास सांगावे.
( हे ही वाचा: Diwali 2021: नरक चतुर्दशी का साजरी केली जाते? जाणून घ्या पौराणिक कथा )
फटाक्यांमुळे इजा झाल्यास हे करावे आणि हे करू नये:
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही आय ड्रॉप वापरू नयेत.
डोळे स्वच्छ पाणी किंवा सलाईनने धुवून घ्या.
डोळे चोळू नका.
डोळ्यांवर ताण येईल असे काहीही करू नका.