Pillow Cleaning Hacks : घरातील भांडी, कपाट आणि इतर गोष्टी स्वच्छ ठेवण्याबरोबरच बेडरुममधील अंथरुण म्हणजे बेडशीट, उश्या आणि त्यांचे कव्हर्स, गोधड्या अशा सर्व गोष्टीदेखील स्वच्छ ठेवल्या पाहिजेत. कारण या गोष्टी घरातील सर्व जण रोज वापरतात, त्यामुळे दोन आठवड्यातून एकदा तरी अंधरुण स्वच्छ धुतली पाहिजेत. यात उशी आणि त्यांच्या कव्हर्सवर अधिक प्रमाणात धूळ, मातीबरोबर डोक्यावरील तेलाचे डाग पडतात. त्यामुळे इतर अंथरुणांपेक्षा उश्यांची कव्हर्स जास्त कळकट, तेलकट दिसतात, ज्यातून कुबट घाणेरडा वास येतो. अशावेळी त्या डोक्याखाली वापरण्याचीदेखील इच्छा होत नाही. पण, तुम्हाला माहितेय का वॉशिंग मशीनमध्ये अगदी काही गोष्टींचा वापर करून काही मिनिटांत तुम्ही मळकट उश्या एकदम स्वच्छ धुवू शकता. त्या कशाप्रकारे आपण जाणून घेऊ..

तेलकट, मळलेल्या उश्यांमधून खूप कुबट, घाणेरडा वास येत राहतो. अशावेळी उश्या खूपच जास्त घाण झाल्या असतील तर त्या धुवायच्या कशा असा प्रश्न पडतो. त्यामुळे अनेक जण खराब झालेल्या उशा फेकून देतात. पण असे न करता तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये उश्या अगदी काही मिनिटांत चकाचक धुवू शकता.

मळकट उश्या स्वच्छ करण्यासाठी वापरा ‘या’ ट्रिक्स (How To Actually Wash Dirty Pillows)

मळकट, कळकट उश्या स्वच्छ करण्यासाठी आपल्याला तीन गोष्टींची गरज लागणार आहे.
१) डिटर्जंट
२) शॅम्पू
३) व्हिनेगर

उश्या काही मिनिटांत होतील स्वच्छ

१) मकळट, तेलकट उश्या स्वच्छ करण्यासाठी सर्वप्रथम वॉशिंग मशीनमध्ये पाणी भरा आणि त्यात उश्या टाका.

२) यानंतर त्यात एक रुपयांचे शॅम्पूचे पाउच मिक्स करा आणि मशीन ऑन करा आणि थोडावेळ फिरवा.

३) आता त्यात सॉफ्ट डिटर्जंटसह व्हिनेगर घाला. यात व्हिनेगर हे नॅच्युरल क्लिन्झरसारखे काम करते.

४) आता वॉशिंग मशीन १० मिनिटे फिरू दे.

५) हे सर्व झाल्यानंतर आता थोडे गरम पाणी घेऊन त्यात १० मिनिटे उश्या चांगल्या भिजू द्या.

६) तुम्ही मशीनमध्ये कोमट पाणी टाकून या उश्या मशीनमधूनही फिरवून घेऊ शकता.

७) अशाप्रकारे १० मिनिटे मशीन फिरवा आणि बंद करा.

८) आता उश्या मशीनमधून काढून ड्राय करून घ्या आणि कडकडीत उन्हात वाळवा.

Healthy Hair : आठवडाभरात कोरडेपणा अन् फाटे फुटलेल्या केसांपासून मिळेल सुटका; करा फक्त 3 उपाय, केस दिसतील मऊ, घनदाट

उशी धुताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

१) मशीनमध्ये फक्त दोन उशा एकत्र धुण्यासाठी टाका अन्यथा एकदम सगळ्या टाकलात तर त्या धुतल्या जाणार नाहीत.

२) उश्या धुताना मशीनमध्ये त्यावेळी इतर कोणत्याही प्रकारचे कपडे धुवायला ठेवू नका.

३) जर उशीच्या आत पंख असतील तर ती ड्राय करताना काळजी घ्या.

Story img Loader