Homemade Floor Cleaner : प्रत्येकाला आपले घर चमकदार आणि स्वच्छ हवे, असे वाटत असते. घर स्वच्छ ठेवल्याने मनही प्रसन्न राहते. घराची साफसफाई असो किंवा बाथरूमची. प्रत्येक ठिकाणच्या साफसफाईसाठी वेगवेगळी क्लिनिंग प्रॉडक्ट्स बाजारातून विकत आणली जातात. त्यांच्या मदतीने सर्व घर स्वच्छ केल्याने ते अधिक चांगल्या प्रकारे स्वच्छ होईल, असे आपल्याला वाटते. पण तुम्हाला माहीत आहे का की, घरातच अशा अनेक गोष्टी आहेत की, ज्यांच्या मदतीने आपण घर स्वच्छ करू शकतो. त्यासाठी आम्ही घरातील अशा तीन गोष्टी सांगणार आहोत की, ज्या वापरून तुम्ही घरच्या घरी नॅचरल होम क्लीनर बनवू शकता.
व्हिनेगर
घराच्या स्वच्छतेसाठी व्हिनेगरचा वापर करू शकतो. व्हिनेगरच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी फ्लोअर क्लीनर बनवू शकता. ते बनविण्यासाठी एका मगमध्ये दोन कप पाणी गरम पाणी घ्या. आता त्यात चार चमचे लिंबाचा रस आणि २ चमचे व्हिनेगर घाला. त्यानंतर सर्व गोष्टी चांगल्या मिक्स करून एका बाटलीत भरा.
अवघ्या ५ मिनिटांत काळा पडलेला स्विच बोर्ड होईल स्वच्छ, वापरा फक्त ‘या’ ट्रिक्स
स्पिरिट
स्पिरिटचा वापर करूनही तुम्ही घरच्या घरी फ्लोअर क्लीनर बनवू शकता. त्यासाठी एका बाटलीत सहा कप कोमट पाणी घ्या. त्यानंतर त्यात एक कप स्पिरिट घालून मिक्स करा. जर तुमच्याकडे स्पिरिट नसेल, तर तुम्ही तुरटीचा वापर करू शकता. तुम्ही तुरटी बारीक करून गरम पाण्यात टाकूनही फ्लोअर क्लीनर बनवू शकता.
बेकिंग सोडा
बेकिंग सोडा वापरूनही तुम्ही फ्लोअर क्लीनर बनवू शकता. हे बनविण्यासाठी एका भांड्यात एक ते दोम चमचे बेकिंग सोडा घ्या. त्यानंतर त्यात ४ चमचे लिंबाचा रस आणि अंदाजे पाणी मिसळा,.आता हे पाणी एका बाटलीत भरा आणि स्प्रे करून फ्लोअर स्वच्छ करा.
वाइन
बहुतेक लोक वाइन पितात. हीच वाइन तुम्ही फ्लोअर क्लीनर म्हणूनही वापरू शकता. त्यासाठी एका भांड्यात गरम पाणी घ्या. त्यानंतर त्यात २ चमचे मीठ, ३ चमचे लिंबाचा रस व थोडी वाइन एकत्र करून एक लिक्विड तयार करा. हे तयार मिश्रण तुम्ही स्प्रे करून फ्लोअरवरील डाग स्वच्छ करू शकता.