Fast Hacks For Removing Odor From Shoes : हिवाळ्यात पायांना भेगा पडू नये किंवा पायाची त्वचा मुलायम ठेवण्यासाठी बहुतेक जण शूजचा वापर करतात. पण शूज घातल्यानंतर अनेकांच्या पायांना खूप घाम येतो अशावेळी शूजमधून खूप दुर्गंधी येऊ लागते. तुम्ही शूज काढताच आजूबाजूचे लोक आधी नाकावर रुमाल धरतात. अशावेळी अत्यंत लाजिरवाणे वाटते. अनेकजण पायांना येणाऱ्या दुर्गंधीने शूज वापरणं सोडून देतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जर तुम्हीही अशा परिस्थितीत सामना करत असाल आणि वेळेअभावी तुम्हाला शूज धुणे शक्य होत नसेल तर खालील टिप्स तुमच्यासाठी फार उपयुक्त आहेत. ज्याच्या मदतीने तुम्ही शूज न धुता त्यातील दुर्गंधी दूर करु शकता.

शूजमधून दुर्गंधी येत असेल तर फॉलो करा ‘या’ टिप्स (How To Get Rid Of Shoe Smell Instantly)

१) उन्हात ठेवा

शूजमधील दुर्गंधी दूर करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्यांना काही काळ उन्हात ठेवणे. शूजमध्ये ओलावा आणि घामामुळे बॅक्टेरिया वाढतात, जे दुर्गंधीचे मुख्य कारण ठरतत. अशा परिस्थितीत, शूज सूर्यप्रकाशात ठेवल्याने ओलावा निघून जातो आणि बॅक्टेरिया देखील नष्ट होतात, ज्यामुळे दुर्गंधी कमी होते. अशा परिस्थितीत, तुम्ही शूज घातल्यानंतर काही तास उन्हात ठेवू शकता.

२) व्हिनेगर

व्हिनेगरच्या मदतीने तुम्ही शूजमधून येणारी दुर्गंधी दूर करू शकता. यासाठी, एका स्प्रे बाटलीमध्ये थोडे व्हाइट व्हिनेगर घ्या त्यात थोडे पाणी मिसळा. ते शूजच्या आत स्प्रे करा. व्हाइट व्हिनेगरमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करतात.

३) बेकिंग सोडा

बेकिंग सोडा हा एक नैसर्गिक दुर्गंधीनाशक पदार्थ आहे जो ओलावा आणि गंध शोषण्यास मदत करतो. त्यामुळे रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही शूजमध्ये एक चमचा बेकिंग सोडा शिंपडा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते स्वच्छ करा. या प्रक्रियेमुळे शूजमधून येणारी दुर्गंधी दूर होण्यास मदत होऊ शकते.

४) टी बॅग्स

टी बॅगमध्ये असलेले टॅनिन बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करते. टॅनिन हे एक नैसर्गिक संयुग आहे ज्यामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म असतो. यामुळे तुम्ही शूज घातल्यानंतर त्यात टी बॅग ठेवू शकता. यामुळे शूजमधून येणारी दुर्गंधी काही मिनिटांत कमी होईल.

५) एसेंशियल ऑइल

या व्यतिरिक्त तुम्ही शूजमधून येणारा दुर्गंधी दूर करण्यासाठी एसेंशियल ऑइलची मदत घेऊ शकता. यासाठी काही कापसाचे गोळे एसेंशियल ऑइलमध्ये (जसे की लव्हेंडर किंवा निलगिरी) बुडवा आणि ते रात्रभर शूजमध्ये ठेवा. यामुळे शूजमधून येणारी दुर्गंधी दूर होईल.

या सोप्या टिप्स फॉलो करुन तुम्ही तुमचे शूज न ​​धुताही त्यातील दुर्गंधी दूर करू शकता.