थंडीच्या दिवसांत जेव्हा तुम्ही गरम पाण्याने अंघोळ करता तेव्हा बाथरूम धुक्याने भरून जाते. त्यावेळी हवा खेळती राहण्यासाठी कोणताही दुसरा मार्ग नसल्याने बाथरूममधून अनेकदा दुर्गंधी येऊ लागते. अशा परिस्थितीत लोक बाथरूममध्ये एक्झॉस्ट फॅन बसवून घेतात. या फॅनमुळे बाथरूममधील गरम हवा बाहेर जाते; शिवाय हवा खेळती राहण्यास मदत होते. मात्र, त्यासाठी योग्य अशा एक्झॉस्ट फॅनची निवड करणे गरजेचे असते. त्यामुळे आम्ही तुम्हाला नवीन एक्झॉक्ट फॅन खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे सांगणार आहोत; जेणेकरून बाथरूममध्ये ताजेपणा टिकून राहील.
बाथरूमसाठी नवीन एक्झॉस्ट फॅन खरेदी करताना ‘या’ ५ गोष्टी लक्षात ठेवा
१) आकार
तुम्ही बाथरूमच्या आकारानुसार एक्झॉस्ट फॅन खरेदी करायला हवा. कारण- तरच बाथरूममधील हवा आत-बाहेर खेळती राहू शकते. अधिक मोठ्या असलेल्या बाथरूमला मोठ्या आकाराच्या एक्झॉस्ट फॅनची गरज असते.
२) इन्स्टॉलेशन
बाथरूमसाठी नवीन एक्झॉस्ट फॅन खरेदी करताना तो फॅन तुम्हाला छत किंवा भिंतीवर कुठे लावायचा आहे ते लक्षात घ्यायला हवे. त्यानंतरच योग्य अशा एक्झॉस्ट फॅनची निवड करायला हवी.
३) एअर डिलिव्हरी
एअर डिलिव्हरी म्हणजे बाथरूममधील एक्झॉस्ट फॅनद्वारे बाहेर जाणारी खराब हवा. त्यामुळे फॅन जितका चांगल्या रीतीने एअर डिलिव्हरी करीत असेल तितक्या चांगल्या प्रकारे खराब हवा बाहेर निघेल. त्यामुळे एनर्जी कॉस्टही कमी होते. अशा वेळी तुम्ही Crompton Drift Air फॅनसारखे ऑप्शन्स ट्राय करू शकता. कारण- याची एअर डिलिव्हरी 1300.cu.mtr/hr पर्यंत असते.
४) स्पीड
या सर्व गोष्टींमध्ये फॅनचा स्पीडदेखील लक्षात घेणे गरजेचे आहे. फॅनचा स्पीड जितका जास्त असेल तितक्या वेगाने खराब हवा बाहेर जाईल. त्यात एक्झॉस्ट फॅन साधारणपणे 1300 RMP ते 2500 RMP च्या स्पीड ग्रुपमध्ये असतात.
५) एफिशिएन्सी
आजकाल कोणतीही इलेक्ट्रिक वस्तू खरेदी करण्यापूर्वी त्याची एफिशिएन्सी किती आहे ते लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण- एनर्जी सेव्हिंग मॉडेल्स नॉन एनर्जी स्टार मॉडेल्सपेक्षा ७० टक्के जास्त वीज वाचवतात. त्यामुळे तुम्ही अधिक बचतीसाठी मोशन सेन्सर असलेले मॉडेल खरेदी करा.