गॅस शेगडी पेटविण्यासाठी लायटर सर्वांत सुरक्षित मानला जातो. अनेक जण माचिसच्या काडीनेही गॅस पेटवतात; पण ते धोकादायक ठरt शकते. त्यामुळे नेहमी लायटर वापरण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, काही वेळा अचानक लायटर खराब होतो. अशा वेळी लोक ते लायटर लगेच कचऱ्याच्या डब्यात फेकून देतात. पण काही वेळा लायटर इतकाही खराब झालेला नसतो की, तो पुन्हा दुरुस्तच होणार नाही. त्यामुळे लायटर खराब झाला, असे वाटत असल्यास तो फेकून देण्याआधी तुम्ही खालील युक्त्या एकदा आजमावून पाहा. त्यामुळे लायटर पुन्हा वापरण्यायोग्य होऊ शकतो.

१) लायटर गरम वस्तूच्या जवळ ठेवा

थंडी किंवा आर्द्रतेमुळे लायटर सहसा नीट काम करीत नाहीत. अशा परिस्थितीत लायटर उन्हात ठेवा किंवा गरम वस्तूच्या शेजारी ठेवा. पण, चुकूनही लायटर थेट आगीत ठेवून गरम करण्याचा प्रयत्न करू नका.

ब्रेन ट्युमरवर ३० मिनिटांत होणार उपचार; आली ‘ही’ नवी मशीन, पण उपचाराचा खर्च किती? जाणून घ्या

२) लायटर स्वच्छ करा

सततच्या वापरामुळे लायटरमध्ये खूप घाण साचते; ज्यामुळे तो नीट पेटत नाही. अशा स्थितीत लायटर एकदा नीट स्वच्छ करणे गरजेचे आहे. त्यासाठी इअरबड्स वापरा आणि प्रत्येक कोपऱ्यातून लायटर स्वच्छ करा.

३) ‘या’ गोष्टींची काळजी घ्या…

स्वयंपाक करताना लायटर व्यवस्थित योग्य जागी नीट ठेवल्यास, तो जास्त दिवस वापरू शकतो. त्यासाठी स्वयंपाकघरात लायटर अडकवण्यासाठी जागा करा. तसेच तो वेळोवेळी कोरड्या कापडाने स्वच्छ करा. तो सतत खाली पडू देऊ नका. त्याला पाणी लागू देऊ नका. कारण- अशा कारणांमुळे लायटर लवकर खराब होतो.

Story img Loader