Sun Tan Removal Tips: उन्हाळ्यात थोडा वेळ जरी घराबाहेर पडलो तरी त्वचा टॅन होऊ लागते. टॅनिंग ही सामान्य समस्या आहे. मात्र त्यामुळे त्वचा खूप निस्तेज आणि काळपट दिसू लागते, अशा परिस्थितीत काही तरुणी पार्लरमध्ये जाऊन डी-टॅन करुन घेतात. पण हे खूप खर्चिक काम होते. यामुळे आम्ही तुम्हाला त्वचा टॅन होणाच्या समस्येपासून काही वेळात सुटका मिळवण्यासाठी घरच्या घरी डी-टॅन साबण कसा बनवायचा हे सांगणार आहे. ज्यामुळे अगदी कमी पैशात तुम्ही त्वचेवरुन टॅनिंग देखील घालवू शकता आणि पार्लरचा खर्च टाळू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डिजिटल क्रिएटर आणि इन्फ्ल्यूएंसर अंजनी भोजने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर टॅनिंगपासून मुक्त होण्यासाठी घरी डी-टॅन साबण बनवण्याच्या अतिशय सोप्या स्टेप्स सांगितल्याआहेत. ज्याच्या मदतीने तुम्ही घरीच चेहऱ्यावरील टॅनिंगची समस्या दूर करु शकता.

घरच्या घरी डी-टॅन साबण कसा तयार करायचा?

१) सर्वप्रथम ४०० ग्रॅम साबणाचा बेस घ्या आणि तो व्यवस्थित वितळून घ्या.
२) चांगला वितळल्यानंतर साबणाच्या बेसमध्ये थोडीशी मसूर डाळीची पावडर मिक्स करा.
३) यानंतर त्यात साधारण १ कप कॉफी पावडर घाला.
४) आता त्यात १ चमचा मध आणि १ चमचा खोबरेल तेल घालून नीट ढवळून घ्या.
५) सर्व पदार्थ एकत्र केल्यानंतर, तयार केलेली पेस्ट साबणाच्या साच्यात टाका आणि थंड होऊ द्या.
६) अशाप्रकारे २ तास हे मिश्रण व्यवस्थित सुकल्यानंतर तुमचा डी-टॅन साबण तयार होईल.
७) हा साबण तुम्ही आंघोळीसाठी वापरू शकता.

व्हिडिओमध्ये, अंजनी भोज सांगते की, हा घरगुती डी-टॅन साबण फक्त ७ दिवसात वापरल्याने तुम्ही आश्चर्यकारक परिणाम दिसू शकतात.

डी-टॅन साबण बनवण्यासाठी वापरलेल्या पदार्थांमधील फायदेशीर गुणधर्म

१) मसूर डाळ

मसूराच्या डाळीत अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात, जे त्वचेचे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून बचाव करतात. याशिवाय मसूराचा वापर नैसर्गिक एक्सफोलिएंट म्हणून देखील केला जातो. यामुळे डेड स्कीन सेल्स निघून जाते. ज्यामुळे टॅनिंग कमी होते आणि त्वचेचा टोन सुधारतो.

तत्काळ तिकीट बुकिंगचं टेन्शन सोडा! कन्फर्म सीट मिळवण्यासाठी करा फक्त ‘हे’ एक काम

२) कॉफी

बऱ्याच हेल्थ रिपोर्टमध्ये असे सूचित केले जाते की, कॉफीमध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात, जे हानिकारक फ्री रॅडिकल्सपासून त्वचेचे संरक्षण करण्यास देखील मदत करतात. याव्यतिरिक्त त्यात कॅफिन आढळते, जे चेहऱ्यावरील ब्लड सर्कुलेशन वाढवण्यास मदत करते, यामुळे त्वचा अधिक चमकते आणि त्वचेचा हरवलेला रंग परत मिळवण्यास मदत होते.

३) मध आणि खोबरेल तेल

मधामध्ये असलेले त्वचेचे एक्सफोलिएट करण्यात आणि त्वचेच्या मृत पेशी काढून खडबडीत त्वचा मऊ करण्यास मदत करतात. या व्यतिरिक्त खोबरेल तेलात त्वचा उजळ करणारे नैसर्गिक गुणधर्म आहेत. जे त्वचेवरील टॅनिंग दूर करत त्वचा चमकदार करण्यास मदत करते.