6 Natural Remedies For Hair Fall : आजकाल अनेकजण केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत लोक केसांच्या काळजीसाठी महागडे शॅम्पू आणि विविध हेअर केअर प्रोडक्ट्स वापरतात, पण त्याने फारसा फरक पडत नाही. उलट अशा गोष्टींमुळे अधिक केस गळू लागतात. यात काहीजण केसांची योग्य काळजी घेत नाहीत. केसांना तेल न लावणे, कोंड्यावर उपचार न करणे, सकस आहार न घेणे अशा अनेक कारणांमुळे केस गळती वाढू लागते. पण तुम्ही काही नैसर्गिक घरगुती उपाय करुन केस गळती रोखू शकता. यासाठी बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा तन्ना हिने १ रुपयाही खर्च न करता केस गळती रोखण्यासाठी काही जबरदस्त उपाय सांगितले आहेत. ज्या मदतीने केस निरोगी आणि मुळांपासून मजबूत ठेवता येतात. पण नेमके कोणते उपाय जाणून घेऊ…
केस गळणे आणि तुटणे रोखण्यासाठी फॉलो करा ‘हे’ उपाय (6 Hair Fall Prevention Tips)
१) जर तुमचे केस खूप गळत असतील तर दररोज काही मिनिटे बेडवर झोपून डोकं जमिनीच्या दिशेने वाकवा. आता बॅक कॉम्बिंग करा म्हणजेच केसावर विरुद्ध बाजूने फनी फिरवा, यामुळे टाळूमध्ये ब्लड सर्क्युलेशन वाढते. केस मुळांपासून मजबूत होऊ शकतात.
२) तुम्ही सलग काही दिवस हेड ड्रॉप व्यायाम करा. यासाठी पलंगावर पाठ करुन झोपा आणि डोकं जमिनीच्या दिशेने खाली वाकवा. केस जमिनीच्या दिशेने राहिले पाहिजेत. काही काळ त्याच स्थितीत रहा. यामुळे केसांमध्ये ब्लड सर्क्युलेशन वाढते आणि केस मुळापासून मजबूत होतात.
३) तुम्ही प्राण मुद्राचा सराव करा. हे करण्यासाठी जमिनीवर बसा. करिश्मा तन्नाने व्हिडिओमध्ये जसे केले आहे त्याप्रमाणे बोटं प्राण मुद्रेत ठेवा. केस निरोगी ठेवण्यासाठी आणि केस गळती रोखण्यासाठी हा सर्वोत्तम योग प्रकार आहे.
४) केस मोकळे करा आणि त्यातून हात फिरवा. मुठ घट्ट करुन केस हळूवारपणे ओढा. हेअर पुलिंग करून तुम्ही तुमचे केस जाड, निरोगी आणि मुळांपासून मजबूत ठेवू शकता.
५) दररोज आपल्या तळहाताने डोक्यावर टॅप करा. असे तुम्ही दररोज ५ मिनिटे करा. हे सर्व व्यायाम नियमित केल्यास केसांसंबंधीत अनेक समस्यांपासून आराम मिळेल.