Perfect Body Shaping Workout : परफेक्ट फिगर मिळविणे ही प्रत्येक महिलेची इच्छा असते. पण वाढत्या वयाबरोबर प्रत्येक टप्प्यात महिलांच्या शरीरात हार्मोनल बदल होत असतात. त्यामुळे परफेक्ट फिगर मिळविणे आव्हानात्मक होऊ बसते. यात आजकालच्या महिला तीन गोष्टींमुळे त्रस्त आहेत. एक म्हणजे नितंबाचा वाढता आकार, दुसरं म्हणजे सुटलेलं पोट व तिसरी म्हणजे मांड्यांची वाढती चरबी. या सर्व गोष्टींमुळे संपूर्ण शरीर ओबडथोबड आणि पसरल्यासारखे दिसू लागते. पण या गोष्टींवर वेळीच नियंत्रण मिळवले नाही, तर या समस्या आणखी वाढतात. अशाने तुमचा शरीराचा पूर्ण लूक तर खराब होतो. त्याशिवाय भविष्यात चालतानाही त्रास होऊ लागतो. म्हणून सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर या अशा लोकांसाठी एक असा व्यायामप्रकार घेऊन आल्या आहेत; जो रोज फॉलो केल्यास तुम्ही तीन महिन्यांत एकदम परफेक्ट फिगर मिळवू शकता.
परफेक्ट फिगर मिळविण्यासाठी करा योगा ब्लॉकचा वापर
सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे; ज्यामध्ये त्यांनी परफेक्ट फिगर मिळविण्यासाठी एक सोपा व्यायामप्रकार स्टेप बाय स्टेप दाखवला आहे.
१) सर्वप्रथम नीट उभे राहा. त्यानंतर आपल्या मांड्यांमध्ये योगा ब्लॉक ठेवा. दोन्ही मांड्यांमध्ये तो ब्लॉक अशा प्रकारे ठेवा; जेणेकरून तो योगा करताना खाली पडणार नाही.
२) आता दोन्ही हात समोरच्या दिशेने करून, पाय दुमडून या योगा ब्लॉकसह खुर्चीच्या पोजमध्ये खाली बसा.
३) आता पुन्हा उभे राहा आणि आपले हात त्याच दिशेने ठेवा.
४) तुम्हाला हा व्यायाम पाच सेटमध्ये तीन महिने सतत या पद्धतीने करावा लागेल.
या व्यायामप्रकाराचे फायदे
हा व्यायाम करण्याचे अनेक फायदे आहेत. सर्वप्रथम हे आपल्या मांड्यांवरील अतिरिक्त चरबी कमी करण्यास फायदेशीर आहे. कारण- जेव्हा तुम्ही हा व्यायामप्रकार करता, तेव्हा मांड्यांच्या स्नायूंवर ताण येतो, त्यामुळे चरबी वितळते आणि मग मांड्यांची चरबी कमी होण्यास मदत होते.
दुसरे म्हणजे नितंबावरील चरबी कमी करण्यास मदत करते जेव्हा तुम्ही वर-खाली अशी हालचाल करता आणि विटांमुळे मांड्यांमध्ये अंतर असते, तेव्हा नितंबांच्या चरबीवर ताण येतो. त्यामुळे हिप फॅट कमी होण्यास मदत होते.
शेवटी हा व्यायाम केल्याने तुमच्या पोटाची चरबी लवकरात लवकर कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे कंबरेच्या वाढत्या घेरावर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे हे सर्व फायदे लक्षात घेत, ऋजुता दिवेकर यांनी सुचवलेला हा व्यायाम तुम्ही करावा.
(परंतु तुम्हाला पायांशी संबंधित काही त्रास असेल किंवा इतर कोणताही आजार, तर हा व्यायामप्रकार करताना आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)