हल्ली वाढत्या वजनामुळे लोक त्रस्त असल्याचे दिसतात. अशा परिस्थितीत वजन कमी करण्यासाठी ते विविध पद्धतींचा अवलंब करतात. त्यातील काही पद्धतींचा वापर करून वजन झपाट्याने कमी करता येते. मात्र, यातील काही पद्धती आरोग्यासाठी काही वेळा धोकादायक ठरतात. त्यामुळे आयसीएमआरने लोकांना हळूहळू वजन कमी करण्याचे आवाहन केले आहे. आयसीएमआरने अलीकडेच जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना संतुलित आहार घेण्याची शिफारस केली आहे. तसेच वजन झटकन कमी करण्याच्या प्रयत्नात लठ्ठपणाविरोधी औषधे न घेण्याचे आवाहन केले आहे.

आयसीएमआरच्या मते, वजन हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी आहारात रोज १००० कॅलरीज असणे आवश्यक आहे. कारण- त्यातून शरीरास सर्व पोषक घटक मिळतात. दर आठवड्याला अर्धा किलो वजन कमी करणे सुरक्षित मानले जाते. पण, तरीही काही जण झटपट वजन कमी करण्याच्या नादात लठ्ठपणाविरोधी औषधांचा वापर करतात; जे टाळले पाहिजे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

3 महिन्यांत दिसेल अभिनेत्रींप्रमाणे एकदम परफेक्ट फिगर; रोज १० मिनिटे करा ऋजुता दिवेकरने सांगितलेला ‘हा’ १ व्यायामप्रकार

वजन कमी करण्यासाठी ICMR ने सांगितल्या ‘या’ सोप्या ट्रिक्स

१) पुरेशा भाज्यांसह संतुलित आहार घ्या.
फायबर आणि पोषक घटकांचे प्रमाण जास्त असलेल्या अन्नपदार्थांमुळे खाण्याची लालसा कमी करण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे अतिरिक्त कॅलरीजची गरज कमी होईल.

२) अधिक पालेभाज्या खा
कॅलरी कमी असलेल्या आणि जीवनसत्त्वे, खनिजे व फायबरचे प्रमाण भरपूर असलेल्या भाज्या वजन कमी करण्यास मदत करतात.

३) पोर्शन कंट्रोल करा
पोर्शन कंट्रोल करण्याकडे लक्ष केंद्रित करा. यामुळे तुम्ही जास्त खाणे टाळू शकता.

४) स्मार्ट स्नॅक
मूठभर साधा मेवा, साधे दही, मसाले टाकून बनविलेल्या भाज्या यांसारख्या पोषक घटकांनी युक्त पदार्थांची निवड करा.

५) निरोगी स्वयंपाक पद्धतींचा वापर करा
ग्रिलिंग, बेकिंग, स्टिमिंग किंवा सॉसिंग यांसारख्या स्वयंपाक बनविण्याच्या पद्धतींना तेल कमी लागते. पण तेलात तयार केलेल्या खाद्यपदार्थांमधील पौष्टिक घटकांचे प्रमाण कमी होते.

६) साखरयुक्त पेयांचे सेवन मर्यादित करा
सोडा आणि फळांचा रस यांसारखी साखरयुक्त पेये कमी प्या. त्याऐवजी पाणी, हर्बल चहा यांसारखी साखर नसलेले पेये प्या; जे शरीरासाठी फायदेशीर ठरतील.

७) खाद्यपदार्थांवरील लेबल वाचा
खाद्यपदार्थांवरील कॅलरी, फॅट, साखर व सोडियम, अशी माहिती लिहिलेली लेबले वाचा आणि त्यानुसारच अन्नपदार्थांची निवड करा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diy weight loss hacks how much weight loss per week is safe and healthy options for weight loss as per icmr sjr
Show comments