डायपर हा लहान मुलांसाठी महत्त्वाचा घटक आहे. डिस्पोजेबल डायपर घालून तुम्ही लहान मुलांना बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकता. हे डायपर लगेच बदलता येतात; पण मुलांसाठी डायपरचा वापर करताना पालकांनी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. डायपरला एक्स्पायरी डेट असते का? डायपरचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी? याविषयी आज आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहोत.
डायपरला एक्स्पायरी डेट असते का?
डायपरला ठरावीक एक्स्पायरी डेट नसते. हा नियम सर्व प्रकारच्या डायपरना लागू होतो. डायपरचा उपयोग करताना ठरावीक एक्स्पायरी तारीख नसते; पण खरेदी केलेल्या डायपरचा वापर दोन वर्षांच्या आत करावा. दोन वर्षांपूर्वीचे डायपर वापरताना त्याची रंगासह गुणवत्ता तपासली पाहिजे. पण, याचा अर्थ असा नाही की, डायपर खराब झाले आहेत. त्यामुळे हे डायपर वापरणे फायदेशीर आहे की नाही, हे आपण ओळखू शकतो.
हेही वाचा : चांगली सून होण्यासाठी काय करावे? ‘या’ टिप्स वापरून व्हा सासूबाईंची लाडकी सून
डायपर मॅन्युफॅक्चरिंगच्या काही वर्षांनंतर याची गुणवत्ता कमी होऊ शकते. पण, चांगल्या प्रकारे डायपर स्टोअर केल्यामुळे डायपरची एक्स्पायरी डेट तुम्ही वाढवू शकता.
ओलावा, उष्णता किंवा प्रकाशामुळे डायपरची गुणवत्ता खराब होऊ शकते. जर डायपर थंड आणि कोरड्या जागी ठेवले, तर डायपर अधिक काळ टिकू शकतात. डायपरचे पूर्ण पॅकेट कधीही उघडू नका. बाहेरच्या हवेमुळेसुद्धा डायपर खराब होऊ शकतात. त्यामुळे डायपर नेहमी हवाबंद पॅकेटमध्ये ठेवा.
असे म्हणतात की, साइज ३ डायपर जास्त वेळपर्यंत टिकतात; पण ही गोष्ट बाळ आणि डायपरच्या ब्रँडवर अवलंबून असते. नवजात बाळाचे डायपर दिवसातून सात वेळा बदलायला पाहिजेत. जास्त वेळपर्यंत बाळाने खराब डायपर घातले, तर बाळाला मूत्रमार्गात संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे लहान मुलांना डायपर घालताना पालकांनी विशेष काळजी घ्यावी.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)