होळी हा सण संपूर्ण देशात अगदी उत्साहात साजरा केला जातो. या वर्षी १८ मार्चला होळी साजरी केली जाणार आहे. होळीच्या दिवशी लोक एकमेकांना रंग लावून या सणाच्या शुभेच्छा देतात. तसेच, सावधगिरी बाळगून, लोक होळीच्या दिवशी त्वचेवर खोबरेल तेल लावून होळी खेळतात जेणेकरुन नंतर रंग सहज काढता येईल. पण होळीनंतर फक्त त्वचाच नाही तर नखांचा रंगही काढणे खूप अवघड असते. म्हणूनच होळी खेळताना तुमच्या त्वचेप्रमाणे तुमच्या नखांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. नखांचा रंग काढण्यासाठी तुम्ही विविध घरगुती उपाय करून पाहू शकता.

व्हिनेगर :

व्हिनेगरचा वापर करून तुम्ही नखांवरील रंग काढून टाकू शकता. यासाठी एका वाटीमध्ये ३-४ चमचे व्हिनेगर घ्यावा. यामध्ये काही वेळ आपली नखे बुडवून ठेवावी. यानंतर कापसाचा वापर करून रंग निघेपर्यंत नखे घासावी.

Holi 2022: होळीच्या रंगांपासून असा करा आपल्या नाजूक डोळ्यांचा बचाव; होणार नाही कोणताही त्रास

आमचूर पावडर :

विविध पदार्थ तयार करण्यासाठी आमचूर पावडर वापरली जाते. याचा वापर तुम्ही नखांचा रंग काढण्यासाठीही करू शकता. एका भांड्यात अर्धा चमचा आमचूर पावडर घ्या. त्यात २-३ थेंब पाणी घालून घट्ट पेस्ट बनवा. ते चांगले मिसळा. ब्रश वापरून नखे स्वच्छ करा. हे नखांचा रंग काढण्यास मदत करेल.

पारदर्शक नेल पॉलिश :

होळीच्या आदल्या रात्री नखे तेलाने स्वच्छ धुवा. त्यानंतर सर्व नखांवर पारदर्शक नेलपॉलिशचा डबल कोट लावा. रंग खेळल्यानंतर, नेलपेंट रीमूव्हर वापरून नेल पॉलिशचा कोट काढा.

Holi 2022: होळी खेळताना स्मार्टफोन सोबत घेऊन जाता येत नाही? ‘या’ टिप्सचा वापर करून फोन ठेवा सुरक्षित

लिंबू :

लिंबाचे अनेक फायदे आहेत. हे वजन कमी करण्यापासून हट्टी डाग काढण्यापर्यंत अनेक कामांमध्ये आपली मदत करते. याचा वापर तुम्ही नखांचा रंग काढण्यासाठीही करू शकता. यासाठी १ लिंबू घ्या. त्याचा सर्व रस पिळून घ्या. एक क्यू-टिप घ्या. लिंबाच्या रसात बुडवून ठेवा. नखे स्वच्छ करण्यासाठी याचा वापर करा.

गडद नेल पॉलिश :

जर तुमच्या नखांवर अजूनही रंग कायम असेल तर गडद रंगाची नेलपॉलिश लावा. सर्वप्रथम, क्युटिकल्सवरील रंगाचे डाग स्वच्छ करा, जेणेकरून नेलपॉलिश लावल्यानंतर तुमची नखे स्वच्छ दिसतील. यासाठी लाल, निळा, मरून अशा गडद रंगांचा वापर करता येईल.

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे)

Story img Loader