अनेकदा आपण बऱ्याच वस्तू खराब झाल्या आहेत किंवा त्यांचा आता काही उपयोग नाही असे समजून त्या फेकून देतो. परंतु तुम्ही ज्या वस्तूंना बेकार समजत आहात, त्या खरंच काही कामाच्या नसतीलच असेही नाही. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या गोष्टींचा पुनर्वापर करू शकता. जर तुम्ही थोडे क्रिएटिव्ह असाल आणि पैसे वाचवण्यावर विश्वास ठेवत असाल, तर या क्रिएटिव्ह आयडिया तुमचे जीवन खूप सोपे बनवू शकतात आणि तुमच्या घरातील कामातही मदत करू शकतात. चला तर मग जाणून घेऊया घरात पडलेल्या कोणत्या गोष्टी नवीन पद्धतीने वापरता येतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एग कार्टन:

जर तुम्ही अंड्याच्या डब्यात म्हणजेच एग कार्टनमध्ये अंडी विकत घेतली तर आपण ते घरी आणून फेकून देतो. पण तुम्हाला एग कार्टन जाळून डास आणि किडे दूर करता येतात. एवढेच नाही तर त्यावर पेंटिंग करून तुम्ही सुंदर वॉल हँगिंग्जही बनवू शकता. तसेच, याच्या मदतीने तुम्ही पक्ष्यांसाठी धान्य ठेवण्यासाठी जागा बनवू शकता. ते ओले करून झाडांची लागवड करताना देखील याचा वापरू तुम्ही शकता.

फ्यूज बल्ब:

घरात जेव्हा बल्ब फ्यूज होतो तेव्हा आपण तो निरुपयोगी समजतो आणि कचऱ्याच्या डब्यात टाकतो. पण याचा वापर करून तुम्ही तेलाचे सुंदर दिवे, हँगिंग प्लांटर्स इत्यादी बनवू शकता. एवढेच नाही तर या बल्बमध्ये दिवाळीचे छोटे दिवे लावून तुम्ही डेकोरेटही बनवू शकता. अशा प्रकारे, ते आपल्या घराच्या सौंदर्यात भर अधिक भर घालतील.

प्लॅस्टिकच्या बाटल्या:

प्रत्येक घरात प्लॅस्टिकच्या बाटल्या सापडतातच. या आपण फेकून तरी देतो किंवा भंगारवाल्याला विकतो. परंतु या बाटल्यांचा वापर करून तुम्ही सुंदर ऑर्गनायझर किंवा डेकोरेट बनवू शकता. यामुळे तुम्हाला केवळ खोली नीटनेटकीच वाटणार नाही तर छोट्या-मोठ्या गोष्टी अगदी सहज ठेवण्यासही तुम्हाला मदत होईल.

टूथब्रश:

जर तुम्ही दर तीन महिन्यांनी टूथब्रश बदलत असाल तर ते फेकून देण्याऐवजी तुम्ही ते क्लिनर म्हणून वापरू शकता. या टूथब्रशचा तुम्हाला घराच्या स्वच्छतेसाठी खूप उपयोग होऊ शकतो. विशेषत: लहान गोष्टी जसे की कीबोर्ड, दागिने, सिंक, बेसिन इ.

जुनी वर्तमानपत्र:

आपण वर्तमानपत्रांना एक दिवसानंतरच जुने समजतो, परंतु आपण त्यांचा गोष्टींसाठी वापरू शकतो. तुम्ही स्वयंपाकघरातील शेल्फवर अंथरण्यासाठी वर्तमानपत्र वापरू शकता, त्यांचा वापर करून तुम्ही आरसा स्वच्छ करू शकता, तसेच पॅकिंगमध्येही ते अगदी सहज वापरू शकता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do not dispose of these useful items reuse can be done in such a way pvp